
छत्रपती संभाजीनगर : आजच्या धावपळीच्या जीवनात वेळ वाचवण्यासाठी आपण काय निवडतो? चमचमीत दिसणारं, झटपट मिळणार पण आरोग्याच्या मुळावर उठणारं डब्यातील अन्न. एकदा डब्बा उघडला की चव लागते, पण हळूहळू शरीरात साठत जातात आजारांचे बीज. दिसायला आकर्षक, पण आतून घातक असलेलं हे अन्न आपल्या आरोग्यावर नेमका कसा परिणाम करतं? डब्यातील अन्नाचे दुष्परिणाम काय होतात? ह्याविषयी आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी माहिती दिली आहे.