TRENDING:

सजवलेली बैलगाडी अन् रोमान्स, फॅन्सना वेड लावेल रिंकूचं हे गाणं, VIDEO

Marathi Song :अभिनेत्री रिंकू ही सैराट चित्रपटामुळे खूपच लोकप्रिय झाली होती. त्यानंतर ती वेगवेगळ्या चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर दिसली. अभिनयासोबतच ती नृत्यही सुंदर करते. तिचा हल्लीच एक क्लासिकल डान्स व्हायरल झाला होता. तिच्या 'कागर' चित्रपटातील एका रोमँटिक गाण्याने चाहत्यांना खूपच वेड लावले होते. ते गाणे होते 'दरवळ मव्हाचा बाई'. त्यात तिने रोमँटिक अंदाज दाखवला होता. तिच्यासोबत अभिनेता शुभंकर तावडेचाही रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला. गाण्यात विविध रंगांच्या साड्या आणि सजवलेली बैलगाडी हे एक विशेष आकर्षण होते. ते गाणे कविता राम, विवेक, राहुल आणि संतोष बोटे यांनी गायले तर संगीत ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी दिले होते.

Last Updated: December 03, 2025, 10:31 IST
Advertisement

Rose Farming Business : उच्चशिक्षित तरुणाची गुलाब शेती भारी, एक निर्णयाने पालटलं नशीब, कमाई तर पाहाच

Success Story

सोलापूर : पदवीधरपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे शहराकडे धाव न घेता सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी गावातील शेतकरी तानाजी हळदे यांनी एका एकरात गुलाबाची शेती केली आहे. यासाठी त्यांना 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. गुलाबाची लागवड करून चार वर्षे झाले असून आतापर्यंत 12 लाख रुपयांचे उत्पन्न तानाजी हळदे यांनी घेतले आहे. या संदर्भात अधिक माहिती शेतकरी तानाजी हळदे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.

Last Updated: December 03, 2025, 13:45 IST

Agri Style Mutton Rassa recipe : अस्सल 'आगरी पद्धतीचा' झणझणीत मटण रस्सा; पार्टी आणि सोहळ्यासाठी ही सोप्पी रेसिपी पाहा!

Food

मटणावर ताव मारायचं म्हटलं की, झणझणीत मटण, नाका तोंडातून पाणी आले पाहिजे. तसा योग बऱ्याच हळदी समारंभात पार्टीत अन्य सोहळ्यामध्ये किंवा जत्रेमध्ये नक्कीच येतो. आणि मटण प्रेमी असाल तर प्रश्नच मिटला अशाच मटण प्रेमी आणि खवय्येगिरींसाठी आम्ही घेऊन आलोय खास आगरी पद्धतीतले झणझणीत मसालेदार मटण. ज्या मटणाची चव आपण हळदी लग्नात नक्कीच बघतो. त्यामुळे काही मटणप्रेमी नक्कीच मटण खाण्यासाठी या कार्यक्रमात आवर्जून बघायला मिळतात. चला त्याच पद्धतीतलं सेम स्टाईलचं मटण आपण आज बनवणार आहोत.

Last Updated: December 03, 2025, 13:14 IST
Advertisement

नोकरी सुटली अन् प्रशांतने सुरू केलं पाणीपुरी सेंटर, आता पगारापेक्षा जास्त कमाई!

नोकरी सुटल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेलेल्या प्रशांत सोनवणे या तरुणाने आता स्वतःचा पाणीपुरू व्यवसाय सुरू करून पुन्हा नव्याने सुरवात केली आहे. जिद्द आणि चिकाटी बाळगून या तरुणाने आज दर महिन्याला 60 ते 70 हजारांची कमाई करणारा पाणीपुरी व्यवसाय यशस्वीरीत्या सुरू केला आहे. जीवनात येणाऱ्या संघर्षांवर वेळोवेळी मात करत पुढे कसे जायचे, हे या तरुणाने आजच्या युवा पिढीला शिकवले आहे. 'लोकल 18' च्या माध्यमातून आपण आज या नव्याने सुरू केलेल्या व्यवसायाची प्रेरणादायी कहाणी जाणून घेणार आहोत.

Last Updated: December 02, 2025, 14:29 IST

नोकरी सोडली अन् कलेलाच फोकस केलं, 22 वर्षांच्या प्रणालीची लाखात कमाई, करते काय?

Success Story

मुंबई: 22 वर्षांची प्रणाली व्हावाळ ही तरुणी फॅशन डिझाईनचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करत होती. पण काही काळानंतर तिला जाणवलं की तिच्या हातातही आणि तिच्या आईच्या हातातही एक सुंदर कला आहे. फॅब्रिकपासून ज्वेलरी तयार करण्याची. अनेक वर्ष आईने या कलेवर घर सांभाळलं, आणि हीच कला स्वतःकडेही आहे हे लक्षात आल्यावर प्रणालीने मोठा निर्णय घेतला. नोकरी सोडून तिने स्वतःचा फॅब्रिक ज्वेलरी व्यवसाय सुरू केला.

Last Updated: December 02, 2025, 14:04 IST
Advertisement

मालवणात रात्री हायव्होल्टेज ड्रामा, भाजप कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप? निलेश राणे आक्रमक

Politics

पोलिसांच्या नाकाबंदी वेळी देवगडमधील एका पक्षाच्या तालुका अध्यक्षांच्या एम एच ०७ ए एस ६९६० या कारमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली. मालवण पोलिसांनी हे वाहन अधिक तपासासाठी पोलीस ठाण्यात आणले असता, मालवण येथील याच पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि अन्य एका कार्यकर्त्याने नंबर प्लेट नसलेली कार घेऊन पोलीस ठाण्यात आणली. हे प्रकरण कळताच आमदार निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यात दाखल झाले. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे मालवणमध्ये मध्यरात्री हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

Last Updated: December 02, 2025, 08:51 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
सजवलेली बैलगाडी अन् रोमान्स, फॅन्सना वेड लावेल रिंकूचं हे गाणं, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल