
गोंदिया जिल्ह्यातील मंगेझरी परिसरात रस्त्याजवळ वाघाचं दर्शन झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या वाघामुळे तिथं प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिक प्रशासनाने तात्काळ नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि रस्त्यावर असताना खबरदारी घेण्याचे आवाहन केलं आहे.