
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना जो विरोध करेल त्याचा पुढच्या काही दिवसात रहस्यमयी मृत्यू होतो. नुकतंच पुतीन यांच्याविरोधात बंड करणाऱ्या प्रिगोज़िनचा विमान अपघातात मृत्यू झाला. म्हणून पुतीन यांना विरोध करणारा एककजण कसा संपतोय याचं कोडं जगाला पडलंय. आजवर पुतिन यांच्या विरोधकांचं मृत्यू सत्र कसं झालं? याचा हा थरारक आढावा.
Last Updated: August 28, 2023, 16:27 ISTमुंबई : हलके-फुलके पण चविष्ट काहीतरी खायची इच्छा झाली की मनात सर्वात पहिले आठवते ते म्हणजे दही तडका आलू. घरगुती चव, सुगंधी तडका आणि थंडगार दही यांचा अफलातून मेळ असलेली ही रेसिपी चवीला जितकी अप्रतिम तितकीच बनवायला अतिशय सोपी आहे. कमी साहित्य, साधी पद्धत आणि फक्त काही मिनिटांत तयार होणारा हा पदार्थ अगदी नवशिक्यांनाही सहज जमतो. तर चला रेसिपी पाहूया.
Last Updated: December 11, 2025, 20:17 ISTपुणे: हॉस्पिटल म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो. कारण दारात पाऊल टाकताच क्षणी किती खर्चाचा डोंगर समोर उभा राहील, याचा काहीच नेम नसतो. काहीजण तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा जात नाहीत. अनेकांची आयुष्यभराची कमाई हॉस्पिटलच्या बिलात खर्च होते. मात्र, पुण्यात एक असे हॉस्पिटल आहे, जिथे तुमच्याकडे पैसे आहेत की नाही याची अजिबात विचारणा केली जात नाही. अगदी माफक दरात उपचार केले जातात. या हॉस्पिटलबद्दलची माहिती संस्थापक विजय फळणीकर यांनी लोकल 18 सोबत बोलताना दिली.
Last Updated: December 11, 2025, 19:53 ISTछत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील गाढे जळगाव येथील शेतकरी नारायण ठोंबरे यांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी अर्धा एकर शेतात 350 पपई झाडांची लागवड केली आहे. या पपई झाडांची पाच बाय आठ वर लागवड करण्यात आली आहे. या पपई बागेसाठी शेणखत, बुरशीनाशकाचा वापर करण्यात आला. तसेच ठिबकद्वारे झाडांना पाणी देण्यात येते. उत्कृष्ट नियोजनामुळे पपई शेतीतून आतापर्यंत 10 टन पपई विक्री करण्यात आली. यातून दीड लाख रुपये उत्पन्न निघाले आहे आणि आणखीही 2 लाख उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा ठोंबरे यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केली आहे.
Last Updated: December 11, 2025, 19:34 ISTमुंबई : हिवाळा सुरु होताच घराघरात तांदूळ किंवा शेवयांची गरमागरम खीर बनवली जाते. पण नेहमीचा स्वाद कंटाळवाणा वाटत असेल तर पौष्टिक अळीवची खीर नक्की करून पहा. अळीव हा हिवाळ्यात खास उपयुक्त मानला जातो. तो शरीरात उष्णता निर्माण करतो, ताकद वाढवतो आणि दिवसाची सुरुवात ऊर्जेने भरलेली ठेवतो. चला तर लगेच जाणून घ्या ही सोपी पण अत्यंत आरोग्यदायी रेसिपी.
Last Updated: December 11, 2025, 18:52 ISTपुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील दत्तनगर गुजरवाडी रोड वर एका तरुणाने दारूच्या नशेत धिंगाणा घातला. ही सगळी घटना १० डिसेंबर रोजी रात्री घडली असून सी सी टिव्ही मध्ये कैद झाली आहे. या तरुणाने एका किराणा दुकानात जात सिगरेट ची मागणी केली पण दुकानात सिगरेट आमच्याकडे मिळत नाही असं दुकानदाराने सांगताच त्या तरुणाने नशेत दुकानाचे नुकसान करायला सुरुवात केली. तसेच तिथे असलेल्या भाजीच्या टोपल्याने, कचऱ्याच्या डब्याने दुकानदाराला मारहाण करायला सुरुवात केली. संबंधित दुकानदाराने पोलिसात तक्रार दाखल केली आहे
Last Updated: December 11, 2025, 18:27 IST