जळगाव नागझरी शिवारात गिरणा नदीत ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाहून गेल्याची घटना समोर आलीय. गेल्या चार ते पाच दिवसापासून जळगाव जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस सुरू असून या पावसामुळे गिरणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात ट्रॉली सह ट्रॅक्टर वाहून गेली. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अवैधपणे वाळू भरत असताना अचानक पूर आल्यामुळे ट्रॅक्टर वाहून गेल्याची व्यक्त केली जात आहे शक्यता. वाळू भरणारे कामगार व ट्रॅक्टर वरील चालक यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने सुदैवाने ते बचावले. (नितीन नांदुरकर, प्रतिनिधी)