कोल्हापूर : लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांचा आवडता सण म्हणजे दिवाळी. या सणामध्ये प्रत्येक दिवसाला विशिष्ट महत्त्व आहे. वसुबारस झाल्यानंतर कार्तिक महिन्यातील त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हंटल जात. धनत्रयोदशी म्हणजे दिवाळी सणातील प्रमुख दिवस मानला जातो. या शुभ दिवशी लोक विविध धार्मिक कार्यात सहभागी होण्याबरोबरच भगवान कुबेर, धन्वंतरी आणि लक्ष्मीमातेची पूजा मोठ्या भक्तीभावाने करतात.