Mumbai Rain: डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसानं कहर केला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. डोंबिवलीच्या निळजे भागात पाणी साचल्याने लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा वारंवार इशारा दिला जात असताना एक व्यक्ती आपली 30 लाखांची कार घेऊन घराबाहेर पडला. मात्र दुर्दैवानं ती गाडी बोगद्याच्या इथे बुडाली. या गाडीला अक्षरश: जेसीबीने बाहेर काढावं लागलं आहे.