TRENDING:

Dahi Toast Recipe : सकाळच्या नाश्त्याची चिंता सोडा, हेल्दी तयार करा दही टोस्ट, सोपी रेसिपी Video

मुंबई : सोशल मीडियावर नवनवीन फूड ट्रेंड्स दर काही दिवसांनी दिसत असतात. सध्या इंस्टाग्रामवर एक साधी पण आकर्षक रेसिपी दही टोस्ट सर्वत्र चर्चेत आहे. या रेसिपीने फूड लव्हर्स आणि हेल्थ कॉन्शस लोकांना वेड लावलं आहे. हजारो रील्स आणि पोस्ट्समध्ये लोक या हेल्दी आणि टेस्टफुल टोस्टचा आनंद घेताना दिसत आहेत. ही रेसिपी इतकी झटपट आहे की ऑफिसला जाण्यापूर्वीही बनवता येते. चवदार असूनही हेल्दी असल्यामुळे लोकांना ती आवडते, तर चला रेसिपी पाहुयात.

Last Updated: November 08, 2025, 16:09 IST
Advertisement

'शाही वरात' थेट जेसीबीतून कोल्हापूरच्या या वरातीने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ.

Viral

कोल्हापुरात एका नवदाम्पत्याची शुक्रवारी रात्री काढण्यात आलेल्या वरातीची चर्चा शहर परिसरात पाहायला मिळाली. कोल्हापूर-गगनबावडा रोडवरील खांडसरी परिसरातून शिंगणापूर रोडवरील पाण्याची टाकी येथील नवरदेवाच्या घरापर्यंत ही वरात काढण्यात आली. संकेत व पूजा माने असे या नवदांपत्याचे नाव आहे. जेसीबी मध्ये बसलेले नवरानवरी आणि पुढे डीजेच्या ठेक्यावर थिरकणारे नातेवाईक, मित्रमंडळी असे चित्र यावेळी पाहायला मिळाले. संकेत यांचे वडील राजेश दत्तात्रय माने हे एक JCB व्यावसायिक असून त्यांच्या मालकीच्या चार जेसीबी आहेत. केवळ हौसेपोटी त्यांनी या जेसीबींपैकी एक जेसीबी मशीन आपल्या मोठ्या मुलाच्या वरातीसाठी वापरली होती..

Last Updated: November 08, 2025, 15:35 IST

Tandalachi ukad : आजारपणात तोंडाला येईल चव, चटपटीत बनवा तांदळाची उकड, रेसिपी एकदम सोपी Video

अमरावती : हिवाळा सुरू झाला की, सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्या सुरू होतात. यामुळे दररोज तयार होणारं घरचं जेवण चविष्ट लागत नाही. काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. पण, आजारी असल्याने बाहेरील पदार्थ खाऊ शकत नाही. अशावेळी तुम्ही तांदळाची उकड बनवू शकता. अगदी चटपटीत आणि चविष्ट अशी ही उकड तयार होते. तसेच कमीत कमी साहित्यात देखील बनवू शकता. चविष्ट अशी तांदळाची उकड कशी बनवायची? त्याची रेसिपी जाणून घेऊया.

Last Updated: November 08, 2025, 14:42 IST
Advertisement

Breast Cancer: महिलांनो... ब्रेस्ट कॅन्सरची 'ही' लक्षणं कदाचित माहित नसतील, चुकूनही करू नका दुर्लक्ष

छत्रपती संभाजीनगर: सध्या कर्करोगाचे (Cancer) प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पुरुष असो किंवा महिला सर्वांमध्येच कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग आहेत पण विशेष करून महिलांमध्ये सध्याला स्तनाच्या कर्करोगाच्या (Breast Cancer) प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. यामागे विविध अशी कारणे आहे. या मागील नेमकी काय कारणे आहेत किंवा यावरती महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे याविषयीच आपल्याला माहिती सांगितलेली आहे डॉक्टर अनघा वरुडकर यांनी...

Last Updated: November 08, 2025, 14:33 IST

विरारहून दररोज येतात दादरला, 20 वर्षांपासून लावतात स्टॉल, फ्रॉकवाल्या आजींची कहाणी

मुंबई : मुंबई दादरच्या गजबजलेल्या रानडे रोडवर गेल्या वीस वर्षांपासून दररोज एकच दृश्य दिसतं, ते म्हणजे रस्त्याच्या कोपऱ्यावर एक सत्तर वर्षांच्या आजी शांतपणे छोटासा स्टॉल लावतात. त्यांचं नाव आहे पार्वताबाई निचुरे आणि त्यांचा हा छोटासा स्टॉल म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर जगण्याची जिद्द आणि आत्मसन्मानाचं प्रतीक आहे.

Last Updated: November 08, 2025, 14:06 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
Dahi Toast Recipe : सकाळच्या नाश्त्याची चिंता सोडा, हेल्दी तयार करा दही टोस्ट, सोपी रेसिपी Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल