
मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईतील रेल्वे पायाभूत सुविधांच्या विस्ताराबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली
Last Updated: December 17, 2025, 16:45 ISTपुणे: आयटी क्षेत्रात तब्बल 29 वर्षांचा अनुभव, लाखो पगाराची नोकरी सोडून पुण्यातील आनंद अभ्यंकर यांनी कांदे पोह्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली आहे. विप्रो कंपनीत ते मॅनेजर होते. पण स्वतःच काहीतरी करायचं या इच्छेतून त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला. सध्या त्यांच्या ‘कांदे पोहे आणि बरंच काही’ या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत असून महिन्याला तब्बल 3 लाखांची उलाढाल होत आहे. त्यांच्या या प्रवासाविषयी त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
Last Updated: December 17, 2025, 18:35 ISTपुणे: पुणे शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढत आहे, धूर, धूळ आणि सूक्ष्मकानांच्या वाढत्या प्रमाणामुळे श्वसनाचे आजार वाढू लागले आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे मायकोप्लाजमा निमोनिया जिवाणूमुळे वॉकिंग निमोनियाचा संसर्ग नागरिकांमध्ये आढळून येतोय. याबद्दलची अधिक माहिती डॉ.अविनाश भोंडवे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
Last Updated: December 17, 2025, 17:39 ISTशेतमाल रिकामी झाली की, धनगर आपल्या मेंढ्या घेऊन गावोगावी शेतमालात फिरताना दिसतात. ही परंपरा काही वर्षांपासून असल्याचे सांगितले जाते. रात्रभर मेंढ्या शेतात बसवायच्या, त्यातच प्रत्येकाकडे 200 ते 500च्या वर मेंढ्या असतात त्यातूनच मेंढीपालन आपल्या मेंढ्या ओळखण्याची पद्धत जणू आपल्याला आकर्षित करते. लहान मुलांप्रमाणे मेंढ्यांना सुद्धा टोपण नावे दिले आणि लॉक म्हणजे कानाला खुणा केल्या जातात. तसेच मेंढ्यांच्या चेहऱ्यावरून नावे ठेवतात किंवा शरीरावरच्या खुणा यावरून हे मेंढी पालन करणारे आपल्या मेंढ्या ओळखतात.
Last Updated: December 17, 2025, 16:27 ISTसावंतवाडीची पारंपरिक कलाकुसर आणि सागवान लाकडाच्या समृद्ध वारशाची ओळख जपत “आम्ही सावंतवाडीकर” या स्थानिक ब्रँडने ग्राहकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. शुद्ध सागाच्या लाकडापासून तयार करण्यात आलेली खेळणी, घरगुती वापरातील वस्तू आणि अँटिक शो पीस यांची मोठी श्रेणी या ब्रँडखाली उपलब्ध असून, उत्कृष्ट गुणवत्ता, टिकाऊपणा आणि कलात्मक नक्षीकाम यामुळे या वस्तूंना मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे या सागवानी वस्तूंच्या किंमती केवळ 60 रुपयांपासून सुरू होत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांनाही त्या सहज परवडणाऱ्या ठरत आहेत.
Last Updated: December 17, 2025, 15:34 IST