नालासोपारा येथील अमलीपदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणांचा धुडगूस दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भरदिवसा दुकानांमध्ये चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. अशाच एका दुकानात चोरी करताना रंगेहात नशेबाज तरुणाला स्थानिकांनी पकडलं आहे. स्थानिकांनी बेदम चोप दिला. त्याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.