मुंबई : दिवाळी जवळ आली की बाजारपेठा ग्राहकांनी फुलून जातात. कपड्यांबरोबरच दागिन्यांनाही मोठी मागणी असते. सोन्या-चांदीचे दर उंचावत असल्याने लोक आता कृत्रिम ज्वेलरीकडे अधिक आकर्षित होत आहेत. या ज्वेलरी दिसायला आकर्षक, टिकाऊ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खिशाला परवडणारी असते. त्यामुळे जर कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा उत्तम काळ मानला जातो.