नौदलातील संशयित अग्निवीर सैनिकाने सर्व्हिस रायफल काडतुसांसह घेऊन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवार 6 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना येथील पश्चिम नौदल कमांड मुख्यालयाच्या निवासी वसाहतीत घडली. सुरक्षेतील ढिलाईचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस आणि गुन्हे शाखेची अनेक पथके संशयित अग्निवीरचा शोध घेत आहेत. आतापर्यंत हा संशयित रायफल आणि जिवंत काडतूसं तपास यंत्रणांना सापडलेली नाही. मात्र याचा सीसीटीव्ही समोर आला आहे