उरण मध्ये हीट अँड रनची घटना घडलीय. कारने उभा असलेल्या पाच बाईक आणि अनेकांना जबर धडक दिली. यात तिघे गंभीर जखमी झाले आहेत. तर गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कारचालक घटनेनंतर फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. (प्रमोद पाटील, उरण)