मुंबई लोकलमध्ये एका माथेफिरुने चालू असलेल्या ट्रेनमध्ये महिला डब्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याने महिलांना अश्लील चाळे आणि शिवीगाळ करून त्रास दिला आहे. घटनेत महिलांनी मदतीसाठी हेल्पलाइनवर कॉल केला असता मदत मिळालेली नाही. या प्रकारामुळे महिला प्रवाश्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे .