नांदेडमधल्या रुग्णालयात रुग्णालयातील अव्यवस्था आणखी किती बळी घेणार असा गंभीर प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. आज एका न्यूमोनियामुळे आजारी असलेल्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान खा. सुप्रिया सुळे जेव्हा रुग्णालयातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्या तेव्हा मुलाच्या मातेनं त्यांच्यासमोर टाहो फोडला.