नांदेडच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात सोमवारपासून अवघ्या 48 तासात 31 जणांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली. याची दखल घेण्यासाठी स्थानिक खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालय गाठलं. तिथली अस्वच्छता आणि गैरसोय पाहून हेमंत पाटलांनी चक्क डीननाच स्वच्छता करायला लावली.