
नाशिक: संकटात खचून न जाता धैर्याने उभं राहिलं की यश कसं मिळवता येतं, याचं उत्तम उदाहरण नाशिकमधील सुशील पठाडे या तरुणाने घालून दिलं आहे. उंची कमी पडल्यामुळे पोलीस होण्याचं स्वप्न भंगलं तरी खचून न जाता, सुशीलने आपल्या भाच्याच्या साथीने पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला. आज हा व्यवसाय त्यांना महिन्याला तब्बल 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून देत आहे.
Last Updated: Jan 05, 2026, 16:00 ISTमहेश मांजरेकर आणि खासदार संजय राऊत यांची ठाकरे बंधूंची मुलाखत घेतली. तेव्हा राज ठाकरे मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले, आज संकट महाराष्ट्रावर आहे, मुंबईवर आहे. हे संकट मराठी माणसाला समजलं आहे.काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरु आहे हे ही माहिती आहे.एकच गोष्ट आम्ही एकत्र यायचं कारण नाही, आमच्याच अस्तित्वाची नाही तर मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. बाहेरुन येणाऱ्यांची दादागिरी वाढत आहे.
Last Updated: Jan 08, 2026, 15:55 ISTअंबरनाथमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण 12 नगरसेवकांनी भाजप प्रवेश केला आहे. त्यांचा हा प्रवेश नवी मुंबईमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पाडला.
Last Updated: Jan 08, 2026, 15:40 ISTकोल्हापुरात एक प्रचारात एक वेगळा रंग पाहायला मिळाला. आम आदमी पार्टीचे शाहिर दिलीप सावंत आपल्या लेकीसोबत निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यांनी आपली मुलगी दिप्ती जाधव यांच्यासोबत डफ तुंतुण वाजवत प्रचार केला आहे.त्यांनी या शाहिरी मधून समस्या आणि सामाजिक प्रश्न मांडले आहेत. आम आदमी पार्टीमधून दिप्ती जाधव उभ्या राहिल्या आहेत.
Last Updated: Jan 08, 2026, 15:30 ISTराष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाल्या, "अकरा वर्ष तुमची सरकार केंद्र सरकारमध्ये आहे. मग रेल्वेमध्ये का नाही सुधारणा झाली अकरा वर्षात ? यांचे नंबर्स करोडो रुपये. या सरकारला बीग तिकीट प्रोजेक्ट्स मध्ये का एवढा इंटरेस्ट असतो ?"
Last Updated: Jan 08, 2026, 15:12 ISTराष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाल्या, " कोस्टल रोडचं क्रेडिट कितीही घेतलं तरी यांना मान्य करावच लागेल की कोस्टल रोडचं सगळं श्रेय सिंगल विंडो उद्धवजींना जातं. तेव्हा मीही विरोध केला. पण जेव्हा मला समजलं की सगळं अभ्यास करुन केले आहे. ती लाईफ लाईन आहे."
Last Updated: Jan 08, 2026, 15:00 IST