
Ahmedabad Plane Crash LIVE Video: अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं आहे. अपघातावेळी तब्बल 242 प्रवासी विमानात होते. विमान अहमदाबादवरून लंडनला निघालं होतं. मात्र टेकऑफ घेताच काही वेळात हे कोसळलं. अहमदाबाद प्लेन क्रॅशवेळी विमानाला आग लागल्याचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आलाय. हा LIVE व्हिडीओ अंगावर शहारे आणणारा आहे.
Last Updated: June 12, 2025, 15:11 ISTछत्रपती संभाजीनगर: सध्याला मुलींमध्ये आणि महिलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये PCOD आणि PCOS यांसारखे गंभीर आजार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. यामागे विविध अशी अनेक कारणं आहेत. तर नेमकी काय कारणे आहेत किंवा याच्यावर काय उपाय करावे, याविषयीची सविस्तर माहिती स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर पूजा कोहकडे सपकाळ यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितली आहे.
Last Updated: December 10, 2025, 14:04 ISTलग्नसराईला सुरुवात झाली असून सध्या बाजारपेठांमध्ये लग्न सामग्रीची खरेदी जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर दादर येथील ‘दत्तधुनी’ या दुकानात रुखवतासाठी लागणाऱ्या विविध पारंपरिक वस्तू अतिशय परवडणाऱ्या दरात उपलब्ध असल्याने ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. डिसिल्वा रोडवर, सावरकर भाजी मंडईच्या समोर हे दुकान आहे. रुखवताच्या वस्तूंच्या किंमती येथे फक्त 50 रुपयांपासून सुरू होत आहे. नवरीच्या हातातली ‘सुरी’ येथे केवळ 50 रुपये, तर नवऱ्याच्या हातातली ‘कट्यार’ 100 रुपयांना मिळत असल्याने ग्राहक विशेष आकर्षित होत आहेत.
Last Updated: December 10, 2025, 13:43 ISTचांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्येही मोठी विविधता आहे. काही मैल अंतर पार केलं की त्यामधील वेगळेपण लक्षात येतं. विदर्भानंही स्वत:ची खाद्यसंस्कृती जपलीय. 'गोळा भात' हा अस्सल वऱ्हाडी पदार्थ संपूर्ण देशात चांगलाच फेमस आहे. हा गोळा भात कसा तयार होतो याची माहिती नागपूरचे दिग्गज मास्टर शेफ विष्णू मनोहर यांनी दिली आहे.
Last Updated: December 09, 2025, 18:05 ISTअमरावती : यावर्षी पावसामुळे संत्रा पिकाचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या संत्रा बागा देखील उद्ध्वस्त झाल्यात. आता जवळपास सर्वच शेतकऱ्यांची संत्रा बाग रिकामी झाली आहे. त्यामुळे आता झाडांची काळजी घेऊन आंबिया बहारासाठी झाडे तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी आता संत्रा बागेचे नियोजन नेमकं कसं असावं? याबाबत माहिती कृषी मार्गदर्शक आणि प्रगतशील शेतकरी मयूर देशमुख यांनी दिली.
Last Updated: December 09, 2025, 17:50 ISTपुणे: पिंपरी- चिंचवड महानगरपालिका नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवत असते. त्यापैकीच एक उपक्रम सध्या कमालीचा चर्चेत आला आहे. तो म्हणजे, नको ते द्या, हवे ते घेऊन जा हा उपक्रम ओंजळ फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे.
Last Updated: December 09, 2025, 16:55 IST