प्रियांका गांधींच्या रोड शोमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या घोषणा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी रविवारी नागपुरात दोन मतदारसंघात रोड-शो करणार हे नियोजीत होतं. त्यांच्या स्वागतासाठी पक्षाने जोरदार तयारी केली . काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे आणि मध्य नागपूरचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी यांचा रोड-शो आयोजित करण्यात आला होता मात्र रोड शो वेळी भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.