TRENDING:

'कार्यकर्ते जीवाचं रान करतात , त्यांना खड्यासारखं बाजूला टाकता', नाव न घेता अजित पवारांचा चंद्रकात पाटलांवर निशाणा,VIDEO

पुणे

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचार सभा झाली. त्यात त्यांनी नाव न घेता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, " पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्ते जीवाचं रान करतात आणि तुम्ही त्यांना खेळवत ठेवता. त्यांना खड्यासारखं बाजूला टाकता."

Last Updated: Jan 04, 2026, 21:24 IST
Advertisement

'बिग बॉस मराठी 3' चा उपविजेता जय दुधाणेला अटक, VIDEO

'बिग बॉस मराठी 3' चा उपविजेता आणि 'स्पिट्सविला'चा विजेता अभिनेता जय दुधाणेला बेड्या पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मराठी सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली. जय दुधाणे याला ५ कोटींच्या फसवणूक प्रकरणात मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं.

Last Updated: Jan 04, 2026, 20:36 IST

Political Report : अजितदादांचा टोला भाजपचा चौफेर हल्ला

Politics

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये शा‍ब्दिक फैरी झडताहेत. ज्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याच्याच सोबत मी सत्तेत बसलोय, असे सांगत अजित पवार यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला. त्यामुळे अजित पवार यांच्या आरोपांची धार पाहून भाजप नेतेही चांगलेच खवळले आहेत.रवींद्र चव्हाणांनंतर आता, घरला जायचं आहे का? असे म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की दमात घेऊ नका, हलक्यात पण घेऊ नका, कारण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमचा आहे, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

Last Updated: Jan 04, 2026, 20:27 IST
Advertisement

'माझे पप्पा मला आणून द्या' चिमुकल्याचा आक्रोश, अमित ठाकरे रडले VIDEO

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मनसेचे नेते बाळासाहेब सरवदे यांची भरदिवसा हत्या करण्यात आली, ज्यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अशातच आज मनसे नेते अमित ठाकरे यांनी सरवदे यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं आहे. मी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सांगणार आहे. त्यांनी एक दिवस प्रचार सोडून इकडे यावं.मी त्यांच्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार आहे. असंही अमित ठाकरे यांनी म्हंटले आहे.

Last Updated: Jan 04, 2026, 20:12 IST

Political Report : सोमय्याविरोधात अपक्षाला साथ, ठाकरे गटाचा मोठा डाव

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपले सुपुत्र नील सोमय्या यांच्याविरोधात ठाकरेंचा उमेदवार नसल्याचा दावा केला होता. पण आता ठाकरे गटाने मोठा डाव खेळला आहे. संजय राऊत यांनी सांगितले की, जागा वाटपाच्या वेळी आम्ही या जागेसाठी आग्रही होतो. मात्र, शरद पवार गटाने ही जागा मागून घेतली. मात्र, अर्ज पडताळणीत ही जागा बाद झाली. याच मतदारसंघात दगाफटका होऊ शकतो, या विचाराने कडवट शिवसैनिक दिनेश जाधव यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता.नील सोमय्या यांचा विजय हा बिनविरोध होणार नसल्याचे त्यांनी म्हटले.

Last Updated: Jan 04, 2026, 19:58 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
'कार्यकर्ते जीवाचं रान करतात , त्यांना खड्यासारखं बाजूला टाकता', नाव न घेता अजित पवारांचा चंद्रकात पाटलांवर निशाणा,VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल