पुणे: पुण्यात मुलींचा जन्मदर कमी होत आहे, असं एका अलीकडील झालेला सर्व्हेमधून समोर आल आहे.पण हडपसरमधील मेडिकेअर हॉस्पिटलचे डॉ.गणेश राख गेल्या अनेक वर्षांपासून मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी काम करत आहेत.त्याच्या हॉस्पिटलमध्ये मुलीचा जन्म झाल्यास एकही रुपया फी आकारली जात नाही. पूर्णपणे मोफत मुलीची प्रसूती केली जाते.विशेष म्हणजे, मुलीच्या जन्मानिमित्त हॉस्पिटलमध्ये फुले लावली जातात, मिठाई वाटली जाते आणि वाजत-गाजत जंगी स्वागत केले जाते.