पुणे : महाराष्ट्रात प्रत्येक भागातील खाद्यसंस्कृतीचं वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. सर्व भागांमध्ये काही खास पदार्थ मिळतात. हे पदार्थ त्यांच्यातील वेगळेपणानं त्या भागाची खास ओळख बनली आहेत. खान्देशातील लग्नामध्ये आवर्जून खाल्ला जातो तो पदार्थ म्हणजे वरण बट्टी. खान्देशातील हा वरण बट्टी पदार्थ पुण्यात खान्देशी जंक्शन या हॉटेलमध्ये खायला मिळतो. या ठिकाणी वरण बट्टी खाण्यासाठी मोठी गर्दी असते.