विरेंद्र उत्पत, सोलापूर : मंगळवेढा - पंढरपुरचे भाजप पुरस्कृत माजी आमदार प्रशांत परिचारक बंडखोरीच्या तयारीत आहेत. मंगळवेढा-पंढरपुरची उमेदवारी विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना जवळपास निश्चित मानली जात आहे. दरम्यान, परिचारक यांनी कार्यकर्त्यांना गुराढोरांची उपमा दिली. पुन्हा कोणाच्या दावणीला जाऊन वैरण खा अस कधीच सांगणार नाही असं प्रशांत परिचारक म्हणालेत.