सोलापूर जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या सुरू असलेल्या या पावसामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. रेवण महादेव शिंदे यांनी पाच एकरामध्ये एक एकर उडीद, एक एकर सोयाबीन आणि तीन एकर मध्ये कांद्याची लागवड केली होती. परंतु या सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे जवळपास पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.