TRENDING:

Success Story: संधी मिळाली अन् सोनं केलं! नाशिककर धानिषाच्या जिद्दीची कहाणी

Success Story

नाशिक: कोरोना काळात नाशिकच्या धानिषा भंडारी या उच्चशिक्षित तरुणीने केक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आज नाशिकमध्ये या तरुणीचे चांगलेनाव प्रसिद्ध झाले आहे. इतकेच नाही तर याच व्यवसायामुळे ही तरुणी चांगला रोजगार देखील मिळवत आहे. तिला ही कल्पना कशी सुचली हे लोकल १८ च्या माध्यमातून तिने सांगितले आहे.

Last Updated: November 10, 2025, 13:31 IST
Advertisement

शेतीसोबत दुग्ध व्यवसाय कसा सुरू करावा? उत्पादनात कशी होईल वाढ? कृषी तज्ज्ञांचा सल्ला

Success Story

बीड: शेतीवर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय एक उत्तम पर्याय ठरू शकतो. सध्या शेतीचे उत्पन्न केवळ पीकविक्रीवर अवलंबून राहण्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसोबत दुग्ध व्यवसायाला महत्त्व देणे आवश्यक आहे. दुग्ध व्यवसायामध्ये गाय, म्हैस, शेळी किंवा रानडुक्कर यांचा समावेश करून त्यांचे पालनपोषण करून दूध उत्पादन वाढवता येते. योग्य प्रकारचे प्राणी निवडणे आणि आरोग्यपूर्ण वातावरण तयार करणे हा व्यवसाय यशस्वी होण्याचा पहिला टप्पा आहे. शेतीसोबत दुग्ध व्यवसाय उत्पादन कसे सुरू करावे? याबद्दलच कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: November 10, 2025, 13:18 IST

Coffee दररोज पित असाल, तर तुम्हाला हे माहित असायलाच हवं! Experts सागतात...

मुंबई: अनेक महिलांना सकाळची फ्रेश सुरुवात करण्यासाठी किंवा रात्री उशिरापर्यंत जागे राहण्यासाठी गरम गरम कॉफी पिण्याची सवय असते. काहींना ते काम करत असताना, अभ्यास करताना किंवा काहीही करत असताना सतत कॉफी पिण्याची गरज भासू शकते. यासाठी नक्कीच कॉफी हे तुमच्यासाठी योग्य पेय असू शकते. पण तुम्ही तुमच्या मासिक पाळीदरम्यान कॉफीचे सेवन करत असाल तर कॅफीन प्यायल्याने तुमच्या मासिक पाळीवर काय परिणाम होऊ शकतो? याचीच माहिती मुंबईतील आहारतज्ज्ञ आरती भगत यांनी दिलीय. 

Last Updated: November 08, 2025, 20:05 IST
Advertisement

ब्युटी पार्लर सुरू करण्याचा विचार करताय? किती येईल खर्च? पाहा Video

वर्धा : मेकअप हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सुंदर दिसण्यासाठी महिला मेकअप करतात. यासाठी महिला या ब्युटी पार्लरमध्ये जातात. त्यामुळे अनेक महिला ब्युटी पार्लरच्या व्यवसायात येऊ इच्छित असतात. त्यासाठीच ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणकोणते स्किल्स महत्त्वाचे आहेत? तुम्ही कमीत कमी खर्चात घरीच ब्युटी पार्लर कसे सुरू करू शकता? या संदर्भात वर्धा येथील ब्युटीशियन प्रीती खडसे माहिती दिली आहे.

Last Updated: November 08, 2025, 19:35 IST

Health Tips : डिप्रेशनच्या गोळ्या घेताय? आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, आधी हे वाचा

पुणे

पुणे : आजकाल अनेक लोक डिप्रेशन म्हणजेच नैराश्याचा सामना करत आहेत. ऑफिसमधील कामाचा ताण, घरगुती समस्या, एकटेपणा यामुळे मानसिक तणाव वाढत चालला आहे. त्यामुळे अनेकजण डिप्रेशन कमी करण्यासाठी औषधे घेत आहेत. मात्र, ही औषधे हृदयासाठी किती धोकादायक ठरू शकतात, हे अनेकांना माहिती नाही. याबाबतची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.

Last Updated: November 08, 2025, 19:01 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Success Story/
Success Story: संधी मिळाली अन् सोनं केलं! नाशिककर धानिषाच्या जिद्दीची कहाणी
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल