सांगली: मार्केटमध्ये घरगुती पद्धतीने बनवलेल्या पदार्थांची मागणी वाढते आहे. हीच मागणी लक्षात घेवून सांगली जिल्ह्यातील नागावच्या सविता संतोष पाटील यांनी अन्नप्रक्रिया उद्योग सुरू केला. घरच्या रेसिपीला मार्केटिंगची जोड देत सविता या व्यवसायात वर्षाकाठी जवळपास 10 लाखांची उलाढाल करत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, लोणची, उन्हाळी पदार्थासह शंभरहून अधिक प्रकारचे पदार्थ बनवतात. घरगुती पद्धतीने बनवले जाणारे त्यांचे पदार्थ परिसरातील ग्राहकांमध्ये विश्वासनीय ब्रँड तयार झाला आहे.