शरद पवार यांचा आज ८५वा वाढदिवस असून आज दिल्लीमध्ये आहेत. त्यांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी आज त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक नेत्यांची रीघ लागली आहे. यावेळेस शरद पवार यांनी वाढदिवसानिमित्त केक तलवारीने कट केला.