हॉर्न का वाजवला या रागातून एका तरुणाने चक्क वाहनावर चढून चालकाला मारहाण केलीये. नांदेड शहरातील आयटीआय चौकात ही घटना घडली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झालाय.. . प्रकाश नागरगोजे हे डॉक्टर आहेत. लोहा तालुक्यातील मालकोळी येथे त्यांचं रुग्णालय आहे. नेहमीप्रमाणे ते वाहनातून हॉस्पिटला जातं होते. आयटीआय चौकात वाहतूक कोंडी झाल्याने त्यांनी हॉर्न वाजवला .. त्यावरून तरुणाने हॉर्न का वाजवत आहात अस म्हणत त्यांना शिवीगाळ करुन वाद घातला .. इतक्यावरच न थांबता त्या तरुणाने वाहनावर चढत आणि नागरगोजे यांना मारणार करण्यास सुरुवात केली. मारहाण सुरु असताना नागरगोजे यांनी वाहन घेऊन पोलीस ठाण्यात पोहचले.