
वर्धा: विदर्भाची खाद्यसंस्कृती अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे. विदर्भातील मराठा पाटोडी, सावजी, यासह डाळ-कांदा देखील प्रसिद्ध आहे. विदर्भ कोष्टी डाळ-कांदा अनेक खवय्यांना भूरळ घालतो. त्यामुळे शाकाहारी जेवणात या पदार्थाला मोठी पसंती असते. हाच विदर्भ कोष्टी चमचमीत डाळ-कांदा घरगुती पद्धतीनं कसा बनवायचा हे वर्धा येथील गृहिणी कीर्ती अलोणे यांनी सांगितली आहे.
Last Updated: November 12, 2025, 19:36 ISTछत्रपती संभाजीनगर : आपल्या पैकी अनेकांना चायनीज पदार्थ खायला खूप आवडतात. नूडल्स मंचुरियन, सूप, फ्राईड राईस, हक्का नूडल्स हे सर्व पदार्थ आपण अगदी आवडीने खातो. मात्र, या चायनीज पदार्थांमध्ये अजिनोमोटो हा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात वापरला जाते. अजिनोमोटो हे पदार्थाला चव आणायला मदत करते. पण हे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते का? अजिनोमोटोने शरीराला फायदा होतो का? आपण हे किती खावं? हे कोणी खाऊ नये? याविषयीच छत्रपती संभाजीनगरमधील आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 12, 2025, 20:56 ISTछत्रपती संभाजीनगर : उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदात फलाहार महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी फळे येत असतात. आता हिवाळा सुरू असून या काळात पेरूचा हंगाम असतो. त्यामुळे आता बाजारात मोठ्या प्रमाणात पेरू विक्रीसाठी आलेले आहेत. पेरू आरोग्यासाठी अत्यंत लाभादायी मानला जातो. पेरू खाण्याचे आरोग्यासाठी नेमके काय फायदे होतात? याविषयी छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ञ्ज मंजू मठाळकर यांनी माहिती दिलीये.
Last Updated: November 12, 2025, 20:31 ISTजालना : योग केल्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. शारीरिक तसेच मानसिक समस्यावर देखील योग परिणामकारक ठरत आहे. अनेक महिला पुरुष योगासने करून आपले शरीर तसेच मन तंदुरुस्त ठेवत आहेत. आपल्यापैकी अनेकांना पाठदुखी, कंबरदुखी आणि मणक्याचे त्रास असतात. विशेषतः महिला वर्गांमध्ये हे त्रास जास्त प्रमाणात आढळून येतात. या समस्यांवर देखील विशिष्ट योगासने केल्यास आराम मिळू शकतो. याबद्दलच जालना येथील योगशिक्षिका गीता कोल्हे यांनी माहिती सांगितली आहे.
Last Updated: November 12, 2025, 20:01 ISTजालना: आपल्या जीवनात योगसाधना करण्याचे अनेक फायदे आहेत. शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी योगा करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. महिलांसाठी तर योगा हे एक प्रकारचे वरदानच आहे. महिलांना वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. अनियमित मासिक पाळी, लठ्ठपणा, पाठदुखी, कंबर दुखी, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या सामान्यपणे स्त्रियांमध्ये आढळतात. या समस्यांतून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते योगासन केल्यास फायदा होऊ शकतो? हे जालना येथील योगशिक्षिका गीता कोल्हे यांनी सांगितलं आहे.
Last Updated: November 12, 2025, 19:05 IST