नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा: वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील कार प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. ओव्हरफ्लोच्या प्रवाहात युवक वाहून गेला. पुराच्या पाण्यात वाहून गेलेला युवक अजूनही बेपत्ता आहे. अजय सलामे असं बेपत्ता युवकाचं नाव आहे. कारंजा पोलिसांची घटनास्थळी दाखल झाले आहेत. कारंजा पोलिसकडून बेपत्ता युवकाचा शोध सुरू आहे. सततच्या पावसामुळे नदीनाले दुथडी भरून वाहात आहेत.