दुबईत आयोजित 14 व्या सांस्कृतिक ऑलिम्पियाड स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत त्यांनी भारतीयांच्या मानाचा तुरा रोवला. या विजयामुळे त्यांच्या आई-वडिलांबरोबरच संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. स्वरा आणि रागिनीच्या कलेचं श्रेय त्यांच्या आई-वडिलांना आणि शिक्षिका वैभवी यांना जातं. मागील दोन वर्षांत वैभवी यांनी या दोघींना वेगवेगळ्या प्रकारच्या लावणी व नृत्यशैलींमध्ये प्रवीण बनवलं.
advertisement
स्वरा आणि रागिनीच्या यशाने त्यांच्या आई-वडिलांना अनपेक्षित आनंद दिला आहे. आई आरती आणि वडील संतोष ललवाणी यांनी आपल्या मुलींना नेहमीच मुलासमान वागणूक दिली. त्यांच्या कलेला प्रोत्साहन देत वेळोवेळी पाठीशी उभे राहिले. त्यांच्या परदेशातील विजयाने महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
स्वरा आणि रागिनी या चिमुकल्या मुलींनी जे साध्य करून दाखवलं ते पाहून त्यांची आई आरती आणि वडील संतोष ललवाणी यांनी स्वप्नात देखील विचार केला नव्हता, त्यामुळे आता त्यांच्या मुलींचं हे यश पाहून त्यांना आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटतंय.





