महिलेची गाडी पोलिसांनी थांबवली म्हणून तिला खूप राग आलाय. महिला पोलिसांसोबतच वाद घालू लागली. नंतर तिनं एका पोलिसालाही उडवलं आणि निघून गेली. या घटनेचा व्हिडीओही समोर आलाय. पाहून तुम्हीही चकित व्हाल.
असे प्राणी ज्यांच्या शरीरात नाही एकही हाड, काय आहे कारण?
महिला आणि पोलिसांमधील झालेल्या वादाची घटना पाकिस्तानची आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, एक महिला पोलिसांसोबत हुज्जत घालताना दिसतेय. पोलीस चेकपोस्टवर थांबून महिलेची झडती घेत आहे मात्र हे महिलेला आवडत नाही आणि ती चिडते. ती मोठ्याने पोलिसांवरच ओरडते. ती तेथून निघताना गाडीसमोर उभ्या असलेल्या एका पोलिसाला टक्कर देऊन निघून जाते.
advertisement
@gharkekalesh नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 32 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक कमेंट पहायला मिळत आहे. अनेकांनी महिलेची कृती वाईट असल्याचं म्हटलंय.
दरम्यान, सोशल मीडियावर अशा अनेक घटना घडत असतात. अनेक विचित्र प्रकारचे व्हिडीओ समोर येतात. त्यामुळे इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही.