नक्की हे प्रकरण काय?
मार्च 2024 मध्ये रावतपूरमधील महिलेचं उन्नावमधील एका युवकाशी लग्न झालं. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला समजलं की तिचा पती शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही. जेव्हा तिने हे आपल्या जेठानीकडे सांगितलं, तेव्हा तिला दुर्लक्षित करण्यात आलं. काही दिवसांनी जेव्हा तिने पुन्हा हा विषय काढला, तेव्हा सासरच्यांनी शिवीगाळ केली आणि नंतर स्वीकारलं की त्यांना ही गोष्ट आधीच माहित होती आणि हे लग्न केवळ हुंड्यासाठी केलं होतं.
advertisement
पतिचं उपचार करावं अशी विनंती करताच सासरच्यांनी तिला 2 लाख रुपयांची मागणी केली. एवढंच नाही, तर तिच्या दिरानं तिच्यावर वाईट नजर ठेवायला सुरुवात केली आणि छेड काढली. विरोध करताच तिच्यावर हात उचलण्यात आला.
तिला माहेरच्या लोकांना भेटण्यासाठी तिला एका ठिकाणी बोलावलं गेलं, पण त्याठिकाणीच तिला गळफास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ती कसाबसा आपला जीव वाचवून तिथून पळाली आणि तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
सध्या पती, जेठ आणि जेठानी यांच्याविरोधात गंभीर आरोपांखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
हि घटना केवळ एका व्यक्तीची नाही, तर समाजात अजूनही हुंड्यासारख्या विषारी प्रथा किती खोलवर रुजलेल्या आहेत, हे दाखवते. महिलांच्या सुरक्षेसाठी, फसवणूक रोखण्यासाठी आणि मानसिक/शारीरिक हिंसाचार थांबवण्यासाठी यंत्रणांनी तात्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे.