बस्ती जिल्ह्यातील एका रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बाळ खूप आजारी होतं. चांगल्या उपचारासाठी म्हणून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आयुष्मान कार्डने उपचाराला सुरुवात झाली. पण त्यानंतरही रुग्णालयाने कुटुंबाकडून पैसे मागितल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे.
advertisement
22 दिवस बाळावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. उपचारासाठी कुटुंबाने त्यांचं सर्वस्व पणाला लावले. जेव्हा त्यांच्याजवळचे पैसे संपले तेव्हा त्यांनी आपलं शेत गहाण ठेवलं. इतकंच नाही तर बाळाच्या वडिलांनी त्याच्या आईच्या शरीरावरील दागिनेही विकले. जेणेकरून रुग्णालयाचं बिल भरता येईल आणि मुलाला वाचवता येईल.
आई-वडिलांनी आपल्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांना मोठी रक्कम दिली. पण बाळाची प्रकृती खालावत चालली होती. कुटुंबाने डॉक्टरांना मोठ्या रुग्णालयात रेफर करण्याची विनंती केली. पण डॉक्टरांनी दुर्लक्ष केलं. रुग्णालयाने मृत बाळाच्या कुटुंबीयांकडून केवळ पैसे उकळण्यासाठी नाटक केलं. रुग्णालयाने कुटुंबाकडून दोन लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.
नवरा अन् सासरा दोघेही करू लागले शारीरिक शोषण, विवाहितेने लहान मुलीसह उचललं टोकाचं पाऊल, वाचा सविस्तर
जर डॉक्टरांनी मुलाला दुसऱ्या ठिकाणी रेफर केलं असतं, तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. रुग्णालयाने केलेल्या या कृत्यामुळे आरोग्यव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा घटनांमुळे सामान्य माणसांचा डॉक्टरांवरील विश्वास उडण्याची शक्यता आहे. शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.