नवरा अन् सासरा दोघेही करू लागले शारीरिक शोषण, विवाहितेने लहान मुलीसह उचललं टोकाचं पाऊल, वाचा सविस्तर

Last Updated:

शारजाहमधील अल नहदा भागात केरळच्या 33 वर्षीय विपंचिका मणीने आपली दीड वर्षाची मुलगी वैभवीसह आत्महत्या केली. तिच्या फेसबुक अकाउंटवर मिळालेल्या...

Kerala woman dowry death UAE
Kerala woman dowry death UAE
एका केरळच्या महिलेनं आपली लहान मुलगीसह आत्महत्या केली आहे. तिचं नाव मणी असं आहे. तिच्या सुसाईड नोटमध्ये हुंड्यासाठी तिला सहन कराव्या लागलेल्या भयानक शारीरिक, मानसिक आणि लैंगिक अत्याचाराचं सविस्तर वर्णन आहे. पोलिसांनी तिच्या पती, नणंद आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण...
संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) एका केरळमधील आई आणि तिच्या दीड वर्षांच्या मुलीच्या आत्महत्येमध्ये सापडलेल्या सुसाईड नोटमुळे हुंड्यासाठी झालेल्या छळाचे गंभीर आरोप समोर आले आहेत. 33 वर्षीय विपंचिका मनी आणि तिची मुलगी वैभवी यांचे मृतदेह 8 जुलै रोजी शारजाच्या अल नाहदा भागातील एका फ्लॅटमध्ये सापडले.
...शेवटी उचललं टोकाचं पाऊल
विपंचिकाच्या मृत्यूनंतर, तिच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केलेली सुसाईड नोट पाहून कोल्लम पोलिसांनी तिचा पती नितीश बालिआभीथिल, नणंद नीतू बेनी आणि सासरे मोहनन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. असं कळतंय की, या महिलेला तिच्या सासरच्या मंडळींकडून दिवसेंदिवस असह्य छळ सहन करावा लागला. तो सहन न झाल्यामुळे शेवटी महिलेने हा टोकाचा निर्णय घेतला.
advertisement
पण असं का घडलं? 
नोटमध्ये विपंचिका लिहिते, "लग्नात हुंडा कमी मिळाल्याच्या आरोपावरून मला मानसिक आणि शारीरिक यातना दिल्या गेल्या. ते म्हणाले की, लग्न भव्य नव्हते, हुंड्यात गाडी मिळाली नाही. मला भिकारी, बेघर म्हटलं गेलं. त्यांनी माझ्या पगाराचीही मागणी केली." तिने असंही म्हटलं आहे की, तिने तिच्या कुटुंबाचा आणि मुलांचा विचार करून दिवसेंदिवस सर्व प्रकारचे अत्याचार सहन केले. पण शेवटी तिला ते सहन झाले नाहीत. म्हणूनच तिने हा टोकाचा निर्णय घेतला.
advertisement
नवऱ्याची सासऱ्याशी संबंध ठेवण्यास संमती
तिने लिहिलं, "मला कुत्र्यासारखं मारलं गेलं. माझ्या पतीने मला पॉर्नोग्राफीतून शिकलेल्या लैंगिक कृतींसाठी जबरदस्ती केली. मी सात महिन्यांची गरोदर असतानाही, मला घरातून बाहेर काढलं गेलं आणि मला खायलाही दिलं नाही." महिलेने केवळ पतीवरच नाही, तर सासऱ्यावरही भयानक आरोप केले आहेत. तिचा दावा आहे की, तिचे सासरेही तिला शारीरिक अत्याचार करत होते. जेव्हा तिने हे पतीला सांगितलं, तेव्हा तो म्हणाला, "मी तुझ्याशी फक्त स्वतःसाठीच नाही, तर माझ्या वडिलांसाठीही लग्न केलं."
advertisement
आत्महत्या नसून ही आहे हत्या
विपंचिका गेल्या सात वर्षांपासून दुबईतील एका खासगी कंपनीत फाइलिंग क्लर्क म्हणून काम करत होती. तिचा पतीही दुबईतच काम करत होता, पण ते वेगळे राहत होते आणि त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली होती. विपंचिकाच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की, हा मृत्यू आत्महत्या नसून 'दोन हत्या' आहेत. यूएई पोलीसही या प्रकरणाचा तपास करत आहेत.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
नवरा अन् सासरा दोघेही करू लागले शारीरिक शोषण, विवाहितेने लहान मुलीसह उचललं टोकाचं पाऊल, वाचा सविस्तर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement