TRENDING:

9 दिवस दर 90 सेकंदाला थरथर कापत होती पृथ्वी, भूकंप नाही मग काय? अखेर 2 वर्षांनी उलगडलं रहस्य

Last Updated:

Earthquake news : 2 वर्षांनंतर आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासाने हे रहस्य उलगडलं आहे. 'नेचर कम्युनिकेशन्स' हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : 2023 मध्ये एका रहस्यमय घटनेने जगभरातील शास्त्रज्ञांमध्ये खळबळ उडाली. 9 दिवसांपर्यंत दर 90 सेकंदांनी पृथ्वी थरथर कापत होती. हे कंपन भूकंपासारखं होतं, पण त्यांचे कोणतेही स्पष्ट स्रोत नव्हते. नंतर ते फक्त एक गूढ राहिलं. आता तब्बल 2 वर्षांनी याचं रहस्य उघड झालं आहे.
News18
News18
advertisement

2023 मध्ये शास्त्रज्ञांनी जागतिक स्तरावर एक विचित्र भूकंपाचे सिग्नल ट्रॅक केले, जे दर 90 सेकंदांनी येत होते. हे कंपन सलग नऊ दिवस चालले. परंतु भूकंप झाला नाही, ज्वालामुखीचा उद्रेक झाला नाही आणि कोणत्याही उपग्रहाला कोणतीही महत्त्वपूर्ण हालचाल नोंदवता आली नाही. हे कंपन काही अदृश्य शक्ती दर्शवत होते.

2 वर्षांनंतर आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासाने हे रहस्य उलगडलं आहे. 'नेचर कम्युनिकेशन्स' मध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार ते ग्रीनलँडमधील एका प्रचंड मेगा-त्सुनामीशी संबंधित होतं. ज्याच्या लाटा 650 फूट उंच होत्या. ग्रीनलँडच्या पूर्वेकडील भागात असलेल्या डिक्सन फजोर्ड येथील एका विशाल पर्वताचा एक भाग तुटून समुद्रात पडला. या भूस्खलनामागील कारण म्हणजे बर्फाळ हिमनदी वितळणं, जे जागतिक तापमानात वाढ झाल्यामुळे आहे.

advertisement

बापरे! हे कोणतं संकट? निळेशार महासागर होताहेत काळे, रहस्य काय? वैज्ञानिकही चिंतेत

सुमारे 2.5 कोटी घनमीटर खडक आणि बर्फ एकाच वेळी समुद्रात पडला, ज्यामुळे एक प्रचंड मेगा-त्सुनामी निर्माण झाली ज्याला शास्त्रज्ञ सेचे म्हणतात, एक प्रकारची स्थिर लाट जी पाण्याच्या अरुंद भागात वारंवार पुढे-मागे हलते. संशोधनानुसार, या लाटांची शक्ती 500 गिगा न्यूटन इतकी होती, जी एकाच वेळी 14 सॅटर्न व्ही रॉकेट लाँच करण्याइतकी ऊर्जा निर्माण करू शकते.

advertisement

जेव्हा हा भूस्खलन झाला तेव्हा समुद्रात इतकी ऊर्जा निर्माण झाली की लाटा फ्योर्डच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला वारंवार आदळत राहिल्या, जणू एखाद्या महाकाय बाथटबप्रमाणे. लाटांच्या या सततच्या आदळण्याने दर 90 सेकंदांनी पृथ्वी हादरली.

या घटनेचे कोणतंही थेट छायाचित्र किंवा फुटेज नव्हतें. तीन दिवसांनंतर त्या भागात आलेल्या डॅनिश लष्करी जहाजालाही लाटा लक्षात आल्या नाहीत.

advertisement

मग रहस्य कसं उलगडलं?

ऑक्सफर्ड टीमने SWOT (सरफेस वॉटर अँड ओशन टोपोग्राफी) नावाच्या नवीन उपग्रहातील डेटाचं विश्लेषण केलं. या उपग्रहावरील का-बँड रडार इंटरफेरोमीटर (KaRIn) नावाचं उपकरण समुद्राच्या पृष्ठभागावरील 90% पाण्याचं अचूकतेने मॅपिंग करू शकतं. पारंपारिक उपग्रह पद्धती फजॉर्डसारख्या अरुंद भागात लाटांची उंची मोजू शकत नाहीत, परंतु KaRIn तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालं.

advertisement

सगळं नष्ट होणार! पृथ्वीवर एकही जीव राहणार नाही, NASA च्या शास्त्रज्ञांनी तारीख सांगितली

SWOT डेटा वापरून, शास्त्रज्ञांना असं आढळून आलं की फजोर्डच्या दोन्ही बाजूंचे उतार विरुद्ध दिशेने जात होते. हे सीचेच्या उपस्थितीचं निश्चित लक्षण होतं. त्यानंतर त्यांनी ही माहिती भूकंपीय डेटा, हवामान आणि भरती-ओहोटीच्या वाचनांसह एकत्रित करून 2023 मध्ये ही घटना पुन्हा तयार केली. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक थॉमस अॅडकॉक यांनी 'पुढील पिढीतील उपग्रह तंत्रज्ञान रहस्ये कशी सोडवू शकतं याचं एक उदाहरण' असं वर्णन केलं.

या घटनेने हे स्पष्ट केलं आहे की हिमनद्या वितळल्याने केवळ समुद्राची पातळी वाढत नाही तर त्यामुळे होणारे भूस्खलन आणि मेगा-त्सुनामी देखील जागतिक कंपनांना कारणीभूत ठरू शकतात.

मराठी बातम्या/Viral/
9 दिवस दर 90 सेकंदाला थरथर कापत होती पृथ्वी, भूकंप नाही मग काय? अखेर 2 वर्षांनी उलगडलं रहस्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल