गणपतीच्या पूजेसाठी अत्यावश्यक समजली जाणारी परबल फुलं सध्या 100 रुपयांना एक पाव (250 ग्रॅम) या दराने विकली जात आहेत. याचबरोबर शेवंतीची फुलं 280 रुपये किलो दराने विकली जात आहेत. या फुलांचा गणेशपूजेमध्ये विशेष उपयोग असतो त्यामुळे त्यांची मागणी वाढली आहे. चाफ्याच्या फुलांचा देखील भाव वाढला असून 10 चाफ्याची फुलं 50 रुपयांना मिळत आहेत. झेंडूच्या फुलांचा वापर हार बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे त्यांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. झेंडू सध्या 200 रुपये किलो दराने विकला जात आहे.
advertisement
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या मूर्तीचं तोंड कोणत्या दिशेला असावं? जाणून घ्या योग्य दिशा आणि कारण
गणपतीच्या पूजेमध्ये जास्वंदीच्या फुलाला फार महत्त्व आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जास्वंदी देखील भाव खात आहे. जास्वंदाची 6 फुलं 50 रुपयांना विकली जात आहेत. पूजेसाठी अत्यंत महत्वाचं समजलं जाणारं सुपारीचे फुल 50 रुपयांना एक मिळत आहे. घरात सजावटीसाठी व गणेशमूर्तीच्या सजावटीसाठी उपयोगात येणारे हार देखील महागले आहेत. दुर्वांचा हार सध्या100 रुपयांना विकला जात आहे. लहान दुर्वा50 रुपयांना विकल्या जात आहेत. तसेच केवड्याची सुगंधी फुलं 50 रुपयांना एक या दराने विकली जात असून यांचीही मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
दादरमधील फुल विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फुलांना मागणी खूप असल्यामुळे आणि पुरवठा मर्यादित असल्यामुळे भाव वाढले आहेत. ग्राहक मात्र या वाढलेल्या दरांमुळे नाराज आहेत. गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असतानाही वाढती महागाई हे काळजीचं कारण ठरलं आहे.





