TRENDING:

Future Prediction : आजवर कधीच घडलं नाही ते घडणार; टाइम ट्रॅव्हलरची भविष्यवाणी

Last Updated:

आतापर्यंत भविष्याबाबतचे दावे फक्त शब्दात होते, पण स्वतःला टाइम ट्रॅव्हलर म्हणवणाऱ्या स्वित्झर्लंडमधील एका शिक्षकानं एका डायरीत पुढील 2000 वर्षांत घडणाऱ्या सर्व घटनांचा उल्लेख केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : भविष्यात काय घडणार हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. कुणी चेहरा पाहून, कुणी हात पाहून, कुणी जन्मपत्रिका पाहून भविष्य सांगतं. पण काही लोक असे आहेत जे स्वतःला टाइम ट्रॅव्हलर म्हणवतात. आपण भविष्यात जाऊन आल्याचा दावा करतात आणि तिथल्या घटनांबाबत सांगतात. असाच एक टाइम ट्रॅव्हलर ज्यानं भविष्यवाणी केली आहे, जी चर्चेत आली आहे.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

पॉल ॲमेडियस असं या टाइम ट्रॅव्हलरचं नाव, ते एक शिक्षक आहे. स्वित्झर्लंडमध्ये जन्मलेले प्रोफेसर पॉल यांनी आपण 2000 वर्षांनंतरचं जग पाहून परत आल्याचा दावा गेला आहे. त्यांनी भविष्यातील घटना एका डायरीत लिहून ठेवल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी सर्वकाही तपशीलवार सांगितलं आहे. ता ते स्वतः या जगात नाहीत पण त्यांच्या विद्यार्थ्याने पॉडकास्टच्या माध्यमातून पॉल यांनी सांगितलेल्या आगामी घडामोडींची संपूर्ण डायरी जगासमोर आणली.

advertisement

1921 सालात झोपले, 3906 सालात जागे झाले

भाषेचे प्राध्यापक पॉल ॲमेडियस 1921 मध्ये आजारी होते, ज्यामुळे ते कोमात गेले. वर्षभरानंतर जेव्हा ते कोमातून बाहेर आले तेव्हा ते दुसऱ्या जगातून परत आले होते. त्यांनी दावा केला की ते भविष्यात पोहोचले आहेत. 3906 सालातील व्यक्तीचं जीवन जगू लागले. त्यावेळी त्यांनी भविष्याबाबत पाहिलेल्या सर्व गोष्टी एका डायरीमध्ये लिहिल्या. त्यांनी ही डायरी त्यांचा विद्यार्थी जॉर्जिओस पापहाटीसला दिली. या डायरीमध्ये काही अविश्वसनीय गोष्टी आहेत, ज्या वाचून तुम्ही दुःखी आणि आनंदी व्हाल. त्यांची ही डायरी एखाद्या विज्ञानकथेपेक्षा कमी नाही.

advertisement

18 जूनला मोठं संकट; भविष्यवाणीमुळे खळबळ

काय आहे डायरीत?

त्यांनी आपल्या डायरीत लिहिलं आहे की, त्यांना तिथल्या लोकांची भाषा समजत नव्हती. हा स्वर्ग आहे असं त्याला वाटलं, पण तिथं राहताना त्यांना भविष्यातील गोष्टी कळू लागल्या.

त्यांनी लिहिलं की, 300 वर्षांनंतर लोकसंख्या खूप वाढेल आणि खाण्यापिण्याची टंचाई निर्माण होईल. 2200 मध्ये मंगळावर वसाहती तयार होण्यास सुरुवात होईल आणि ती पर्यावरणीय आपत्ती म्हणून संपेल. 2309 मध्ये चीन आणि पाश्चात्य देशांमध्ये युद्ध होईल आणि मानवतेचं खूप नुकसान होईल. यानंतर जागतिक सरकार स्थापन केलं जाईल जेणेकरून पुन्हा युद्ध होणार नाही. 3382 पर्यंत, मानवी मेंदूमध्ये बदल होईल आणि त्याला एक नवीन चेतना, एक नवीन क्षमता मिळेल, ज्याला हायपर व्हिजन म्हटलं जाईल.  100 वर्षांच्या अंधारानंतर 3400 साली सुवर्णकाळ येईल. यानंतर मुले आनंदी होतील आणि लोक तणावमुक्त होतील.

advertisement

Earth end : कधी होणार जगाचा अंत? शास्त्रज्ञांनी अखेर सांगितली तारीख

आता इतर भाकितांप्रमाणे यावर कितपत विश्वास ठेवावा हे सांगता येणार नाही. न्यूज18मराठी या दाव्याची हमी देत नाही किंवा याचं समर्थन करत नाही.

मराठी बातम्या/Viral/
Future Prediction : आजवर कधीच घडलं नाही ते घडणार; टाइम ट्रॅव्हलरची भविष्यवाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल