फास्ट फूडप्रेमींना बर्गर आवडतं. पण या बर्गरमुळे तुम्हाला पैसे कमवण्याची संधी मिळाली तर? फास्ट फूड कंपनी - बर्गर किंग अशी सुवर्णसंधी देत आहे. जर तुम्ही त्यांची ऑफर स्वीकारली तर तुम्हाला अमेरिकन बर्गर कंपनीकडून मोठी रक्कम दिली जाईल.
गोव्यात कोबी मंच्युरियनवर बंदी घालण्याची मागणी का होतेय? काय आहे प्रकरण
न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, फ्लोरिडाची सर्वोत्तम फास्ट फूड चेन बर्गर किंगने आपल्या क्रिएटिव्ह चाहत्यांसाठी एकूण 1 मिलियन यूएस डॉलर्सचं बक्षीस ठेवलं आहे. यासाठी तुम्हाला कंपनीचं व्हूपर सँडविच आपल्या पद्धतीने डिझाईन करावं लागेल. प्रेस रिलीजमध्ये असं म्हटलं आहे, की त्यांना त्यांच्या गेस्ट्सकडून जाणून घ्यायचं आहे की तुम्ही तुमचं सँडविच कसं बनवाल? ज्याने डिझाईन केलेल्या बर्गरला सर्वाधिक वोट मिळतील तो स्पर्धेचा विजेता मानला जाईल आणि त्याला 1 दशलक्ष यूएस डॉलर्स म्हणजेच 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त बक्षीस मिळेल.
advertisement
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची माहिती बर्गर किंगच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, तुमच्याकडे रॉयल पर्क्स अकाउंट असणं आवश्यक आहे. यासाठी 17 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहेत. प्रथम, AI द्वारे बर्गरची इमेज तयार केली जाईल, ज्यामधून काही डिझाईन निवडल्या जातील. निवडलेल्या अंतिम स्पर्धकांना कंपनीच्या मियामी येथील मुख्यालयात बोलावलं जाईल आणि त्यांना त्यांची कॉन्सेप्ट रिफाइन करण्याची संधी दिली जाईल.