गोव्यात कोबी मंच्युरियनवर बंदी घालण्याची मागणी का होतेय? काय आहे प्रकरण
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
चायनीज पदार्थांना भारतात खूप पसंती मिळते. हे बहुतांश पदार्थ इंडो-चायनीज प्रकारातले असतात. मात्र सध्या गोव्यात कोबी मंच्युरियन या पदार्थावर बंदी घालण्याची मागणी होतेय.
नवी दिल्ली : चायनीज पदार्थांना भारतात खूप पसंती मिळते. हे बहुतांश पदार्थ इंडो-चायनीज प्रकारातले असतात. मात्र सध्या गोव्यात कोबी मंच्युरियन या पदार्थावर बंदी घालण्याची मागणी होतेय. म्हापसा इथे तर आधीच ही बंदी घालण्यात आलीय. भारतात सगळीकडे चायनीज पदार्थांना इतकी मागणी असताना, गोव्यात कोबी मंच्युरियनवर बंदी घालण्याची का मागणी केली जातेय, याबद्दल जाणून घेऊ या.
गोव्यात कोबी मंच्युरियन या चायनीज पदार्थावरून बराच गोंधळ झालाय. म्हापसा इथे तर या पदार्थावर बंदीही घालण्यात आलीय. आता तिथे कोणत्याही फूड जॉइंटमध्ये किंवा गाड्यावर कोबी मंच्युरियन मिळणार नाही. कोबी मंच्युरियनवर बंदी घालण्याचं कारण त्यात वापरला जाणारा सिंथेटिक रंग हे आहे. कोबी मंच्युरियनसाठी हा रंग खूप जास्त प्रमाणात वापरला जातो.
गोव्यामधल्या म्हापसा शहरातले नगरसेवक तारक अरोलकर यांनी गेल्या महिन्यात झालेल्या बोडगेश्वर मंदिर जत्रेत कोबी मंच्युरियनवर बंदी घालण्याची मागणी केली होती. परिषदेतल्या इतर सदस्यांनी त्याला त्वरित सहमती दर्शवली होती. त्यानंतर या पदार्थावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी 2022 मध्येही कोबी मंच्युरियनवर बंदी घालण्यात आली होती.
advertisement
कोबी मंच्युरियनमध्ये सिंथेटिक रंग वापरला जातो. मंच्युरियनचा लाल रंग जास्त आकर्षक व उठावदार दिसावा यासाठी भरपूर रंग त्यात घातला जातो. सिंथेटिक रंग आरोग्यासाठी घातक असतात. याशिवाय कोबी मंच्युरियन बनवताना स्वच्छतेचे निकषही पाळले जात नाहीत. अनेकदा तर खराब कोबीचा वापर केला जातो. त्याच्यासोबत दिली जाणारी चटणीसुद्धा गुणवत्तेच्या निकषांनुसार तयार केली जात नसल्याचं आढळलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशननं काही दिवसांपूर्वी कोबी मंच्युरियन तयार करणाऱ्या काही दुकानांवर छापे घातले होते. त्यात चुकीच्या पद्धतीनं कोबी मंच्युरियन बनवत असल्याचं समोर आलं होतं. तसंच मंच्युरियन बनवण्याकरिता जे सॉस वापरलं जातं, ते तयार करण्यासाठी वॉशिंग पावडरचा उपयोग केला जातो.
advertisement
चायनीज पदार्थांमध्ये अनेक भाज्यांचा, मैद्याचा वापर केला जातो. बाहेर गाड्यांवर किंवा दुकानात तयार होणारे हे पदार्थ स्वच्छतेचे निकष पाळून केले जातात का यावर लक्ष दिलं जात नाही. शिळ्या, खराब भाज्या व सिंथेटिक रंग अशा आरोग्यासाठी घातक पदार्थांचा वापर त्यात केला जातो. त्यामुळे गोव्यात काही ठिकाणी कोबी मंच्युरियनवर बंदी घातली गेली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 06, 2024 11:36 PM IST