एका महिलेचं आयुष्य सुरुवातीपासूनच संघर्षमय होते. आर्थिक तंगीमुळे तिला आपला नवजात मुलाला दत्तक द्यावं लागलं. मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिने हा निर्णय घेतला, पण त्याच वेळी तिने आपल्या हृदयाचा एक भागही गमावला. त्या वेळी तिला कल्पनाही नव्हती की हा निर्णय तिच्या आयुष्याला किती मोठ्या संकटात ढकलेल. मुलाला सोडल्यानंतर आई-मुलामध्ये कोणताही संपर्क राहिला नाही आणि काळाने त्यांना एकमेकांपासून दूर नेले.
advertisement
काही दशकांनंतर, तो मुलगा तरुण झाला आणि नियतीने त्यांना परत एकत्र आणले. त्या भेटीत त्यांना आपले रक्ताचे नाते कळले नाही. हळूहळू त्यांच्यात प्रेम झाले आणि त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर त्यांना दोन मुलेही झाली, ज्यामुळे त्यांचे आयुष्य आनंदाने भरून गेले. पण या आनंदामागे एक भयंकर सत्य दडलेले होते, ज्याची कल्पना त्यांनाही नव्हती.
नंतर आपल्या मुलांच्या भविष्याबाबत कायदेशीर सल्ला घेताना त्यांनी डीएनए चाचणी केली आणि त्यांचे आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झाले. अहवालात उघड झाले की महिलेचा नवरा प्रत्यक्षात तिचाच मुलगा आहे, ज्याला तिने 36 वर्षांपूर्वी जन्म दिला होता. हा खुलासा इतका धक्कादायक होता की त्यांची संपूर्ण दुनियाच बदलली.
सोर्स : सोशल मीडिया
महिलेने सांगितले की ती 2015 मध्ये आपल्या नवऱ्याला भेटली, तेव्हा तो 21 वर्षांचा होता. 2016 आणि 2017 मध्ये त्यांना दोन मुले झाली. तिने सांगितले, "मी कधीही विचार केला नव्हता की असा दिवस येईल, जिथे मला माझ्या मुलाला नवऱ्याच्या रूपात पाहावं लागेल."
या धक्कादायक सत्याने त्यांच्या आयुष्यात असा भूकंप घडवला, ज्याचे वर्णन शब्दांत करणे अवघड आहे. आज ते दोघे वेगळे झाले आहेत आणि या दु:खातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्या निरागस मुलांचे भविष्य अधांतरी आहे, आणि आता सर्वांना हा प्रश्न छळत आहे की आता या मुलांचं काय होणार?