रेल्वे दररोज कोट्यवधी लोकांना त्यांच्या गंतव्यस्थानावर नेण्याचे काम करते. परंतू ट्रेनमध्ये प्रवास करताना तुमच्याकडे योग्य तिकीट असणे खूप महत्वाचे आहे, जे टीटीईद्वारे तपासले जाते. तथापि, खूप कमी लोकांना माहित आहे की टीटीई तिकीट तपासण्याचे काही नियम आहेत, ज्यामध्ये तिकीट तपासण्याची वेळ देखील निश्चित केली जाते.
रेल्वेच्या नियमांनुसार, टीटीई तुम्हाला रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत तिकीट तपासण्यासाठी उठवू शकत नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, रेल्वेसाठी बनवलेल्या अनेक नियमांपैकी एक नियम झोपण्याच्या वेळेबाबत निश्चित करण्यात आला आहे. मात्र, ज्यांचा प्रवास रात्री 10 वाजल्यानंतर सुरू झाला आहे, त्यांना हा नियम लागू होणार नाही.
advertisement
पांढरा रंग लवकर खराब होतो, तरी भारतीय रेल्वे प्रवाशांना याच रंगाची चादर आणि उशी का देते?
कोणत्याही व्यक्तीची झोपण्याची वेळ रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत असते आणि सकाळी 6 नंतर, तुम्हाला मधला बर्थ उघडावा लागेल, जेणेकरून इतर प्रवाशांनाही आरामात प्रवास करता येईल. याशिवाय इतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रात्रीच्या वेळी मोठमोठे संगीत ऐकण्यास आणि मोठ्या आवाजात बोलण्यास प्रवाशांना मनाई करण्यात आली आहे.
कार-ट्रक प्रमाणे ट्रेनचं टायर देखील खराब होतं का? किती वर्षांपर्यंत चालतात हे चाक?
आणखी एक नियम असा की, रेल्वेच्या एका नियमानुसार, जर तुमच्याकडे तिकीट घेण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेऊनही प्रवास करू शकता. तथापि, ट्रेनमध्ये चढल्यानंतर, तुम्हाला तुमच्या बोर्डिंग स्टेशनपासून गंतव्य पत्त्यापर्यंत ट्रेनच्या तिकिटासाठी पैसे देऊन TTE कडून तिकीट खरेदी करावे लागेल, त्यानंतर तुम्ही सहजपणे पुढील प्रवास करू शकता.