जोशिलदा नावाची ही महिला चेन्नईतील एका मोठ्या आयटी कंपनीत काम करायची. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका पुरूषावर तिचं एततर्फी प्रेम होतं. त्या पुरुषाचं दुसऱ्या महिलेशी लग्न झालं. याबाबत तिला समजलं तेव्हा ती खूप दुखावली. तिला इतका राग आला की तिने त्या पुरुषाचा बदला घेण्याचं ठरवलं.
सुरुवातीला तिने स्वतःचं आणि त्या पुरुष सहकाऱ्याचे बनावट विवाह प्रमाणपत्र बनवलं आणि ऑफिसमधील लोकांमध्ये आपल्या दोघांचं लग्न झाल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर त्या पुरुषाशी बोलणाऱ्या महिला सहकाऱ्यांना ती घाबरवत असे. एका महिलेने तर निराशेतून नोकरी सोडली होती.
advertisement
Plane Crash: जगातील 5 भयानक विमान अपघात, 11 हजार प्रवाशांचा गेला जीव
यानंतर तिने असा कट रचला की संपूर्ण देशात दहशत पसरू लागली. जोशिलदा ही टेक्निकली खूप हुशार. तिनं टेक्नॉलॉजीची मदत घेतली. तिचं खरं नाव लपवण्यासाठी VPN, व्हर्च्युअल नंबर आणि बनावट मेल आयडी सारख्या सायबर तंत्रांचा वापर केला. इतकंच नाही तर ती असे मेल पाठवत असे जणू काही दुसरा पुरूष पाठवत आहे.
जोशिलदने गेला एका वर्षात 21 हून अधिक मेल पाठवले. ज्यामध्ये देशातील अनेक शाळा, रुग्णालये, महाविद्यालये आणि स्टेडियम बॉम्बस्फोटाच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. हे मेल गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये पाठवण्यात आले होते.
13 जून रोजी अहमदाबादमध्ये ज्यादिवशी एअर इंडियाचं विमान कोसळलं त्यादिवशी बीजे मेडिकल कॉलेजला पाठवलेल्या एका मेलमध्ये तिने आपण एअर इंडियाचं विमान क्रॅश केल्याचं म्हटलं. "तुम्हाला माझी धमकी विनोद वाटली, आता तुम्हाला कळेल की मी किती गंभीर आहे.", असं तिनं म्हटलं. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली.
नव्या महासाथीचं संकट? कोरोनानंतर आता 22 चिनी VIRUS, 75% मृत्यूदराचा इशारा
तिचा हेतू स्पष्ट होता, त्या पुरूषाची बदनामी करणे आणि त्याला कायदेशीर अडचणीत आणणं. पण म्हणतात ना, एका चुकीमुळे सगळं बिघडतं. जोशिलदाने मेल पाठवताना एक छोटीशी टेक्निकल चूक केली. या चुकीमुळे पोलिसांना तिच्याबद्दल माहिती मिळाली आणि तिला चेन्नईहून अटक करण्यात आली.
अहमदाबाद सायबर क्राइम पोलिसांनी जोशिलदाकडून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं, बनावट ईमेल अकाउंट आणि इतर डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. 9 जून रोजी गुजरात उच्च न्यायालयाला मिळालेल्या बॉम्ब धमकीच्या मेलमागे जोशिलदा किंवा तिच्या सहकाऱ्यांपैकी एकाचा हात असल्याचा संशय आहे. यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का याचाही तपास पोलीस आता करत आहेत.