19 सप्टेंबर 2013 रोजी, नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरने मंगळाच्या पृष्ठभागावर एक फोटो काढला. नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरने हे फोटो त्याच्या मार्स हँड लेन्स इमेजरने काढलं, जे रोव्हरच्या रोबोटिक आर्मच्या टोकावर बसवलं आहे. हा कॅमेरा मंगळाच्या पृष्ठभागाचं तपशीलवार फोटो काढण्यात माहिर आहे.
या फोटोकडे त्यावेळी फारसं लक्ष दिलं गेलं नाही. पण अलीकडेच यूएफओ हंटर स्कॉट वारिंग यांनी या फोटोची तपासणी केली. नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरच्या 12 वर्षे जुन्या फोटोत असं काही दिसून आलं ज्यामुळे शास्त्रज्ञांसह सोशल मीडियालाही धक्का बसला.
advertisement
यूएफओ हंटर फोटोत दिसला जीव'?
वारिंगला फोटोच्या खालच्या भागात एक लहान आकार दिसला, जो मशरूमसारखा दिसतो आहे. हा मशरूम असल्याचा दावा त्याने केला आहे. "नासाचे ध्येय इतर ग्रहांवर जीवसृष्टी शोधणं आहे, मग त्यांनी या मशरूमकडे दुर्लक्ष का केलं? त्यांनी त्याला स्पर्श करायला हवा होता, तो कापायला हवा होता किंवा त्यांच्या लेसरने त्याची तपासणी करायला हवी होती!", असं त्याने म्हटल्याचं वृत्त डेली मेलनं दिलं आहे.
एलियन पाठवत आहेत मेसेज? अंतराळातून दर 44 मिनिटांनी सिग्नल, पाहून शास्त्रज्ञही शॉक
स्कॉट वॉरिंग हे चित्र परग्रही जीवनाचा पुरावा मानत असला तरी शास्त्रज्ञांचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे. बर्मिंगहॅम विद्यापीठातील ग्रह भौतिकशास्त्रज्ञ डॉ. गॅरेथ डोरियन म्हणाले, "हा सजीव नाही तर एक सपाट, डिस्कसारखा दगड आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर वारा आणि आणि धूळ असल्यामुळे दगड असे आकार घेऊ शकतात. दोन दगड एकमेकांच्या वर असतील आणि वाऱ्याने धूळ काढून असा आकार निर्माण केला असेल,
मंगळावरील जीवनाचा प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून शास्त्रज्ञांना आणि सामान्य लोकांना उत्सुक करत आहे. क्युरिऑसिटी रोव्हर 2012 पासून मंगळाच्या पृष्ठभागावर शोध घेत आहे आणि त्याने अनेक आश्चर्यकारक पुरावे दिले आहेत. रोव्हरला मंगळाच्या खडकांमध्ये सेंद्रिय रेणू सापडले आहेत, जे जीवनाचे मूलभूत घटक आहेत. तसंच मंगळाच्या वातावरणात मिथेन वायूची उपस्थिती आढळली आहे, जी सूक्ष्मजीव जीवनाचं लक्षण असू शकतं.
पृथ्वीच्या आत धकधक! दर 26 सेकंदांनी होतेय हृदयासारखी धडधड, आवाजाचं रहस्य काय?
पण आतापर्यंत मंगळावर जीवनाचे कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. नासाचं म्हणणे आहे की मंगळावर एकेकाळी पाणी होते, जे जीवनासाठी आवश्यक आहे. पण तिथं कधी सजीव प्राणी होते का, की अजूनही तिथे सजीव प्राणी आहेत? हा प्रश्न अनुत्तरित आहे.