पाटणामध्ये राहणारा रवी रंजन. फेसबुकवर त्याची जान्हवी सिंग नावाच्या तरुणीशी ओळख झाली. जान्हवीने आपण दिल्लीच्या एम्समध्ये डॉक्टर असल्याचं सांगितलं. आपण हार्ट सर्जन आहोत असं तिनं सांगितलं. तसंच पहिल्याच प्रयत्नान यूपीएससी पास केल्याचं ती म्हणाली. आता इतकी शिकलेली मुलगी म्हटल्यावर कुणीही तिच्या प्रेमात पडेल. रवीचंही तेच झालं. तो तिच्या प्रेमात पडला. जून 2024 मध्ये तो तिला भेटण्यासाठी दिल्लीला पोहोचला.
advertisement
बंद शाळेतून येत होता आवाज, गेट उघडून पाहताच सगळेच हादरले; असं होतं काय?
जान्हवीने रवीला घातली लग्नासाठी मागणी
रवी जेव्हा जान्हवीला भेटायला दिल्लीला गेला तेव्हा जान्हवीनेच रवीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. सरकारी नोकरी करणारी बायको मिळते म्हणून रवीनंही लग्नाला होकार दिला. तो जान्हवीसोबत पाटण्याला आला. जिथं 15 जुलैला त्यांचा साखरपुडा झाला. यानंतर 26 जुलै रोजी एका खाजगी कार्यक्रमात त्यांचं लग्न होणार होतं. यावेळी जान्हवी रवीच्या घरी थांबली होती.
जान्हवीचा रवीच्या कुटुंबावर आरोप
रवीच्या घरी राहत असलेल्या जान्हवीनं सोबत बरेच दागिने आणले होते. तिनं रवीच्या नातेवाईकांवर 30 लाखांचे दागिने चोरल्याचा आरोप केला. लग्नापूर्वी तिनं बेऊर पोलिसात तक्रार दाखल केली. इथंच तिची चूक झाली. ती स्वतःच फसली. पोलिसांना जान्हवीवर वेगळाच संशय आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता वेगळंच सत्य समोर आलं.
एका घरात सतत यायची परदेशी मुलगी, लोकांची व्हायची गर्दी; पोलिसांनी टाकला छापा, दृश्य पाहून धक्का
जान्हवीचं धक्कादायक सत्य
जान्हवीच्या कागदपत्रांची तपासणी केली असता तिचे सर्व कागदपत्र बनावट असल्याचे आढळून आले. जान्हवीकडून पोलिसांना दोन आधार कार्ड, बनावट एम्स ओळखपत्र, रोख रक्कम आणि काही बनावट सोन्याचे दागिने सापडले. यानंतर पोलिसांनी जान्हवीला अटक केली. चोरीच्या बनावट दागिन्यांच्या बदल्यात रवीकडून बनवलेले खरे दागिने मिळवण्याचा तिचा प्लॅन होता, असं चौकशीत उघड झालं. यानंतर ती सर्व रोकड आणि दागिने घेऊन पळून जाणार होती. पण त्याआधीच पोलिसांनी तिला अटक केली.
