अनेकजण दिवसाचा तासभर वेळ गेमिंग अॅप्स, सोशल मीडिया किंवा फँटसी स्पोर्ट्सवर घालवत असतात. काहीजण मजेसाठी ते खेळतात, काहीजण मात्र नशिब बदलण्याच्या आशेने ते खेळतात.
एका तरुणासोबत असंच काहीसं घडलं, त्याने मोबाईलमध्ये दररोजचं काम केलं, एका फॅन्टसी खेळात पैसे लावले, फोन थोडावेळ स्क्रोल केला आणि मग झोपला. पण जेव्हा त्याने सकाळी उठताच फोन पाहिला तेव्हा त्याला धक्का बसला कारण त्याला हे कळून चुकलं होतं की तो 4 कोटी रुपये जिंकला होता.
advertisement
युपीमधल्या कौशांबी जिल्ह्यात राहणाऱ्या एका युवकाची ही कहाणी आबे, जी सध्या चर्चेत आहे. एका साध्या कामगाराने आपल्या स्मार्टफोनच्या मदतीने फक्त 39 रुपये लावून एक-दोन नाही तर तब्बल चार कोटी रुपये जिंकले. ही गोष्ट आहे सरायअकिलमधील घासीराम का पुरवा गावातील मंगल प्रसाद सरोज यांची.
मंगल सध्या हापुर शहरात प्लाय बोर्ड बनवणाऱ्या एका कंपनीत काम करत आहेत. नेहमीप्रमाणे त्यांनी 29 एप्रिल रोजी Dream11 या फँटसी क्रिकेट अॅपवर टीम तयार केली. या दिवशी पंजाब आणि चेन्नई यांच्यातील सामना खेळला जात होता. फक्त 39 रुपये खर्च करत मंगल यांनी जोखीम घेतली आणि त्यांच्या टीमने शानदार स्कोअर करत त्यांना चार कोटींचा विजेता बनवलं.
ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. मंगलच्या घरी आणि परिसरात आनंदाचं वातावरण पसरलं. लोक त्यांचं अभिनंदन करण्यासाठी घरी येऊ लागले. सोशल मीडियावरही मंगल सरोज हे नाव ट्रेंड होऊ लागलं.
मात्र, मिळालेल्या चार कोटींपैकी 30 टक्के रक्कम कर (टॅक्स) म्हणून कपात केली जाणार आहे. त्यामुळे मंगल सरोज यांच्या खात्यात 2.80 कोटी रुपये जमा होतील. तरीही एका सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीसाठी ही रक्कम आयुष्य बदलणारीच आहे.