प्लंबर असो किंवा मेकॅनिक, प्रत्येकजण आपला खर्च वाचवण्यासाठी अशा जुगाडाचा वापर करतो. यामुळेच जेव्हा जेव्हा जुगाडशी संबंधित एखादा व्हिडीओ समोर येतो तेव्हा लोक तो केवळ पाहत नाहीत तर तो प्रचंड शेअरही करतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे आज महत्त्वाची गोष्ट झाली आहे. मग ते दुकानात लावण्यासाठी असोत किंवा मग इमारतीच्या आवारात असोत. पण हे कॅमेरे लावण्यासाठी देखील खर्च येतो. शिवाय साधे कॅमेरे कमी किंमतीत असतात पण जेव्हा त्यामध्ये काही फिचर्स ऍड होतात. तेव्हा मात्र ही किंमत वाढते. त्यामुळे जेव्हा इमारत किंवा दुकानाच्या प्रत्येक कोन्यात लक्ष ठेवण्यासाठी 180 डिग्री फिरु शकेल. असे कॅमेरे फारच महाग असतात.
advertisement
परंतु आपण भारतीयांसाठी याचा देखील जुगाड शक्य आहे, जो अगदी फार कमी पैशांत होईल. याचे एक उदाहरण म्हणजे व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ हजारो, हा व्हिडीओ शेकडो-हजारो नाही तर करोडो लोकांनी पाहिला आहे, तुम्हीही अजून पाहिले नसेल तर हा व्हिडीओ पाहा.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्या व्यक्तीने कॅमेरा सामान्य वरून 180 डिग्री कॅमेरामध्ये बदलला आहे. खरं तर, टेबल फॅनच्या फिरत्या मोटरच्या मदतीने, व्यक्तीने सीसीटीव्ही कॅमेरा स्वतःच 180-डिग्री कॅमेरामध्ये बदलला आहे. जेणेकरून त्याच्या मदतीने तुम्ही सर्वत्र लक्ष ठेवू शकता.
आता ही मोटर फिरत राहिल्याने कॅमेराही फिरत राहील. अनेकांना हा जुगाड खूप आवडला, तर असे अनेक लोक आहेत ज्यांनी सांगितले की यामुळे वीज बिलात लक्षणीय वाढ होईल.
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर world_of_engineering_75 नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. ज्यावर लोकांनी अनेक कमेंट्स केसे आहेत. शिवाय या व्हिडीओला शेअर देखील केलं आहे.