TRENDING:

Expensive Whiskey : 53 कोटींची बाटली, 2 कोटींचा पेग; जगातली ही व्हिस्की करेल तुम्हाला कंगाल

Last Updated:

आज आपण अशा एका जगातल्या सगळ्यात महागड्या व्हिस्कीबद्दल बोलणार आहोत, जी पिणं म्हणजे श्रीमंतीचा कहरच.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : तुम्ही कधी विचार केलाय का की एकाच दारूच्या पेगसाठी तुम्हाला तुमचं घर विकावं लागेल? हो! ऐकून धक्का बसला ना? पण ही गोष्ट खरी आहे. जर तुम्ही महागडी दारु पिण्याचे शौकिन असाल तर खरंच तुमच्यावर अशी वेळ येऊ शकते.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

आज आपण अशा एका जगातल्या सगळ्यात महागड्या व्हिस्कीबद्दल बोलणार आहोत, जी पिणं म्हणजे श्रीमंतीचा कहरच.

या व्हिस्कीच्या एका बाटलीची किंमत आहे तब्बल 6.2 मिलियन डॉलर्स, म्हणजे जवळपास 53 कोटी रुपये. एवढ्या पैशात तर एखादं आलिशान घर, गाडी, फार्महाऊस सगळंच विकत घेता येईल. आता तुम्हाला नक्कीच याबद्दल अनेक प्रश्न पडले असतील? ही दारु कोणती? तिचं नाव काय? ती इतकी महाग का वैगरे वैगरे.... चला तुमच्या प्रश्नाची उत्तरं जाणून घेऊ.

advertisement

या व्हिस्कीचं नाव आहे. इसाबेला इस्ले (Isabella’s Islay). खरंतर ही व्हिस्की लिमिटेड एडिशनमध्ये येते. म्हणजे सगळ्यांनाच ती सहज मिळणारी नाही आणि विशेष म्हणजे तिच्या बाटलीवर सोनं आणि हिर्‍यांनी सजावट केलेली आहे. म्हणजे ही फक्त दारू न राहता एक लक्झरी आणि प्रतिष्ठेचं प्रतीक आहे.

Isabella’s Islay

advertisement

पण खरा धक्का तेव्हा बसतो जेव्हा कळतं की या 700 ml च्या बाटलीतून फक्त एक पेग (30 ml) प्यायचा म्हटलं, तरी तो तब्बल 2 कोटी रुपये पडतो. म्हणजे एक पेग प्यायचा म्हटलं, की खिशातून एका आलिशान बंगल्याचा डाऊन पेमेंट जाईलच.

जर तुम्ही व्हिस्कीचे शौकीन असाल आणि लक्झरी गोष्टींचं वेड असेल, तर इसाबेला इस्लेचं नाव लक्षात ठेवा. पण हो, तिचा पेग उचलायचा आधी बँक बॅलन्स चेक करायला विसरू नका.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Expensive Whiskey : 53 कोटींची बाटली, 2 कोटींचा पेग; जगातली ही व्हिस्की करेल तुम्हाला कंगाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल