एका महिलेनं आपल्याच दोन मुलांचा जीव घेतला. याविषयी तिला पश्चातापही नाही. यामुळे दोन्ही मुलं आनंदी असल्याचं तिचं म्हणणं आहे. तिनं दावा केला आहे की, ती तिच्या स्वर्गातील मुलांशी संवाद साधते. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
पोपट हरवला, लावले शहरभर पोस्टर; शोधण्याऱ्यासाठी ठेवलं 10 हजारांचं बक्षीस
लॉरी व्हॅलो डेबेल असं या महिलेचं नाव आहे. लॉरी ही 50 वर्षाची असून तिनं आपल्या दोन मुलांची निर्घुणपणे हत्या केली. 16 वर्षांचा मुलगा जोशुआ डेबेल, 17 वर्षांची मुलगी टायली रायनला तिनं मारून टाकलं. लॉरीनं तिच्या पती एक्स बायको टॅमी डेबेलचाही जीव घेतला. कोर्टात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीत तिनं या गोष्टींचा उलगडा केला आणि तिनं हे पाऊल का उचललं याविषयी सांगतिलं. याविषयी मिरर युकेनं वृत्त दिलं आहे.
advertisement
कोर्टाच्या सुनावणीत लॉरी म्हणाली, येशू मला ओळखतात, येशू मला समजतात. मी माझ्या दोन मुलांसाठी आणि टॅमीसाठी दुःख व्यक्त करणाऱ्या तुम्हा लोकांवर दुःखी आहे. नेमकं काय घडलं हे येशू ख्रिस्तांना माहित आहे. मी कोणाचीही हत्या केली नाही.
VIDEO: 10व्या मजल्यावरून खाली पडली लिफ्ट, लहान मुलं बाहेर पडली आणि....
लॉरी म्हणाली, 2002 मध्ये माझी मुलही टायलीला जन्म देताना तिचा मृत्यू झाला. जेव्हा डॉक्टर तिच्यावर उपचार करत होते तेव्हा तिनं म्हटलं की, मला वाटतंय की माझी आत्मा फरशीवर पडली आहे. परत येण्यापूर्वी ती तिच्या शरीराकडे पाहत होती. या अनुभवामुळे स्वर्ग आणि अध्यात्मिक जगात प्रवेश मिळाला. तेव्हापासून मी स्वर्गात राहणाऱ्या माझ्या मुलांसोबत बोलते. लॉरी म्हणाली माझी मुलं अध्यात्मिक जगात गुंतली आहेत. टिलीला आयुष्यभर शारिरीक वेदनांचा त्रास सहन करावा लागला आणि आता ती सर्व वेदनांपासून मुक्त आहे. मी मुलगा जोशुआसोबत बोलले त्याला नोकरी मिळाली असून तो कामात व्यस्त आहे.
लॉरीच्या मैत्रिणीनं सांगितलं की, लॉरी आणि तिचा नवरा दोघांची मुलं भुतं, झोम्बी होती. 2022 मध्ये त्यांच्या मुलांचे मृतदेह त्यांच्या अंगमात पुरलेले आढळले. दुष्ट आत्म्यांपासून मुक्त होण्यासाठी मुलांना मारणें आवश्यक असल्याचा दावा या जोडप्यानं केला होता. इडाहो जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश स्टीव्हन बॉयस यांनी या जोडप्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
