श्मिट ओशन इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ कोस्टा रिकामधील पुंटरेनास शहरापासून पूर्व पॅसिफिक राईजच्या दिशेने प्रवास करत होते. श्मिट ओशन इन्स्टिट्यूटच्या तज्ञांच्या टीमने सहा दिवसांच्या प्रवासादरम्यान अचानक त्यांनी असं काही शोधून काढलं की तेसुद्धा थक्क झाले.
व्यक्तीला सापडला चकाकणारा दगड; सोनं समजून जपून ठेवला पण काही वर्षांनी बसला धक्का
ग्वाटेमालाच्या किनार्यापासून समुद्राच्या तळाशी मॅपिंग करत होते. तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून ते आश्चर्यचकीत झाले. त्यांना एक उंच सागरी पर्वत दिसला. जो 5.4 चौरस मैल परिसरात पसरलेला आहे आणि समुद्रात आहे. ज्याची उंची 5,249 फूट आहे. याचा अर्थ हा सागरी पर्वत धरतीवर सर्वात उंच बिल्डिंगच्याही दुप्पट उंचीचा आहे. जगातील सर्वात उंच बिल्डिंग बुर्ज खलिफ 2,722 फूट उंच आहे.
advertisement
डेल्मेलच्या अहवालानुसार फाल्कोर संशोधन जहाजावरील 'मल्टी-बीम इकोसाऊंडर'चा वापर करून त्यांनी हा सागरी पर्वत शोधला आहे. श्मिट ओशन इन्स्टिट्यूटचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष वेंडी श्मिट म्हणाले, "फोकर संशोधन जहाजावरील प्रत्येक मोहिमेदरम्यान नवीन गोष्टी सापडतात, ज्या अनपेक्षित आणि आश्चर्यकारक असतात. हा शोध आपल्याला दाखवतो की आपल्या महासागरांमध्ये अजूनही बरंच काही आहे ज्याबद्दल आपल्याला माहिती नाही, ज्याचा शोध सुरू ठेवण्यासाठी आपण उत्सुक आहोत"
Video: जर्मन सैनिकांनी आत्मसमर्पण केलेल्या ठिकाणी सापडला खजिना, एका पाठोपाठ निघतायत नाणी
श्मिट ओशन इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी संचालक डॉ ज्योतिका विरमानी म्हणाल्या, "हा 1.5 किलोमीटरहून अधिक लांबीचा सीमाउंट, जो अजूनही लाटांच्या खाली लपलेला आहे, आपल्याला अजून किती कितीतरी शोधायचं आहे हे दाखवतं"